पुणे : पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भोसले आणि इतर तिघांना ईडीने शनिवारी अटक केली आहे. त्या आधी हे चौघे पुणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये होते. ईडीने PMLA कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे.


अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून ते दुसऱ्यांदा पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधानपरिषदेत नेतृत्व करत आहेत. त्यांना गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी अटक केली होती. आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि संचालक होते.


टॉप सिक्युरिटी प्रकरणी MMRDA चे आयुक्त आर. ए .राजीव यांची सात तास चौकशी


शनिवारी आमदार अनिल भोसले यांचा ताबा ईडीने घेतला आहे. ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) या कायद्यांतर्गत 71 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आमदार अनिल भोसले, सयाजी पांडूरंग जाधव, तानाजी दत्तू पडवळ, शैलेश पडवळ या चौघांना अटक केली आहे.


हे चौघेही शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात होते. या बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सर्वप्रथम गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) कायद्याखाली आरोपपत्र नोंद केलं होतं. आता त्याच आधारे अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे. भोसले आणि इतर तिघांना 11 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी देण्यात आली आहे.


मोठा अपघात टळला; लोणावळ्याजवळ खासगी बस दरीत पडताना थोडक्यात वाचली, सर्व प्रवासी सुखरुप