एक्स्प्लोर

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील गावांमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. यामुळे नागरिकांमध्यो भीतीचे वातावरण असून धुंदलवाडी भागातील अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून भांडीही जमिनीवर पडली. यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात धुंदलवाडी, दापचरी, बहारे भागात भूकंपाचे धक्के पुन्हा बसले आहेत. 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. या परिसरात मागील महिनाभरापासून सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील गावांमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. यामुळे नागरिकांमध्यो भीतीचे वातावरण असून धुंदलवाडी भागातील अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून भांडीही जमिनीवर पडली. यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. वेदांत मेडिकल कॉलेज भागात देखील मोठे धक्के जाणवल्याने कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णांसह नातेवाईकही हॉस्पिटल बाहेर पडले. पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत वेदांत मेडिकल कॉलेज भागात देखील मोठे धक्के जाणवल्याने कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णांसह नातेवाईकही हॉस्पिटल बाहेर पडले पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा, दपचारी, सांसवंद, आंबोली, वरखंडा, वकास तर तलासरी तालुक्यातील तलासरी, वडवली, कवाडा, सवणे, कुर्झे, वसा, कारजगाव गावात मागील महिन्यात  गूढ आवाज होऊन जमीनीला हादरा बसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यावेळी 3.2 रिश्टरस्केलचा भूकंप मोजला गेला होता.  काही ठिकाणी जमीन हादरल्याच्या तर काही ठिकाणच्या घरांच्या भिंतीला तडे गेले होते. त्याआधी 3 नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने हा परिसर हादरला होता. यावेळीही काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजांनी नागरिकांच्या मनात घर केले आहे. दीड महिन्यापूर्वीही अशाच प्रकारे गूढ आवाज येऊन जमिनीत कंपन झाले होते. त्यानंतर शनिवारी 3 नोव्हेंबर रोजी दोन झटके बसले होते. त्यानंतर आज  पुन्हा गूढ आवाज येऊन जमिलीला हादरे बसले. दीड महिन्यात ही चौथी घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget