Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, गेल्या काही तासापासून समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) बंद पडले आहे. तर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जांबरगांव येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मेस पुरवणाऱ्या आणि चारचाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याने त्या संस्थेशी संबंधित लोकांनी टोल नाका बंद केला आहे. मुख्य रस्त्यावर वाहने आडवी लावल्याने टोल नाका पूर्णपणे बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर वाहनधारकांमध्ये मोठं संताप पाहायला मिळत आहे. मात्र संबधित कंपनीचे अधिकारी यावर काहीही बोलयला तयार नसल्याने काही वाहनधारकांनी वाद घालण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
मोठी वाहतूक कोंडी...
समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आज अचानक काही लोकांनी जांबरगांव येथील टोल नाका बदल पाडला. रस्त्यावर चारचाकी गाड्या आडव्या लावल्याने रस्ता पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यावेळी वाहनधारकांनी संबंधित टोल नाकाच्या मॅनेजरला जाब विचारला, मात्र त्यांच्याकडून कोणतेही माहिती दिली जात नव्हती. तसेच आम्ही प्रयत्न करतोय असे सांगण्यात येत होते. त्यामुळे एवढा मोठं गाजावाजा करून सुरु केलेल्या समृद्धी महामार्गावर प्रशासकीय कोणतेही नियंत्रण नसल्याचे पाहायला मिळत आहे.
नेमकं काय आहे प्रकार?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगांव येथे टोल नाका आहे. दरम्यान याच टोल नाकाव्यार कामाला असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना काही संस्थेकडून मेसचा डब्बा पुरवला जातो. सोबतच येण्याजाण्यासाठी चारचाकी वाहने देखील कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. मात्र मेसचा डब्बा पुरवणाऱ्या व्यक्तीचे आणि चारचाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे वेतन गेल्या काही दिवसांपासून थकले होते. अनकेदा मागणी करून देखील संबंधित कंपनीचे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे संतापलेल्या मेस चालक आणि वाहन पुरवणाऱ्या संस्थेच्या काही लोकांनी टोल नाका बंद पाडला. यावेळी नाकाव्यार चारचाकी वाहने देखील आडवी लावण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
ट्रक चालकाने तोडले बॅरिकेट...
टोल नाका बंद पडल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागला. दोन तास पेक्षा अधिक थांबल्यावर देखील रस्ता सुरु होत नसल्याने वाहनधारकांमध्ये संताप पाहायला मिळाला. तर एका ट्रक चालकाने बॅरिकेट उघडण्याची विनंती केली. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने थेट बॅरिकेट तोडून गाडी काढून घेतली. त्यामुळे त्याच्यामागे असलेल्या इतर वाहनधारकांनी देखील टोल न भरता आपल्या गाड्या काढून घेतल्या.
इतर महत्वाच्या बातम्या:
Samruddhi Mahamarg: रस्त्यावरील पाणी कांदा चाळीत शिरले; शेतकऱ्याने थेट 'समृध्दी' महामार्गच रोखले