Sanjay Shirsat  On Uddhav Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज बारसू (Barsu) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर सोलगावात (Solgaon) रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. तर,"लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी प्रकल्प आणू नका.  हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ" असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला. दरम्यान यावरच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची प्रतिक्रिया आली आहे. राज्य पेटवायची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही, असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत शिरसाट बोलत होते. 


काय म्हणाले संजय शिरसाट? 


दरम्यान यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, "बारसू प्रकल्पासंदर्भात सर्व एकमेकांशी समन्वय साधून आहेत. मात्र असे असताना उद्धव ठाकरे यांनी जायचं, चार लोकांचं ऐकायचं आणि आपलं मत बनवायचं असं त्यांचं सुरु आहे. त्यांची दिशाभूल कोण करत आहे हे उद्धव ठाकरेंना कळायला हवं. तर एखादा प्रकल्प येत असेल तर त्याला विरोध करायचा अशी स्ट्रॅटेजी सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गालाही असाच विरोध केला, परंतु आज तो आमची लाईफलाईन झालाय. आपलं राजकारण तिथे जाऊन करण्यात काही हरकत नाही, ही भूमिका त्यांची योग्य नाही. तर राज्य पेटवायची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही." अवकाळी पाऊस पडत असल्याने त्यांची आग विझून जाईल असा खोचक टोलाही शिरसाट यांनी लगावला आहे.


दरम्यान पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, टीका करताना विचार करावा. जो मुख्यमंत्री सर्वांना भेटतो त्यांना हुकूमशाही म्हणत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्यासारखं लॉक लावून वर्षामध्ये बसायचं का? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. तर मुख्यमंत्र्यांना जर तुम्ही हुकूमशाही म्हणत असाल तर‌ लोकशाहीचा अपमान आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवायला काही लोक बारसूला चालले आहेत. जर आम्ही त्यांना अडवलं असतं, तर त्यांनी मला जाऊ दिलं नाही असे म्हणाले असते. तसेच हे सरकार लोकशाही पद्धतीने सुरु आहे, हीच त्यांची पोटदुखी असल्याचं शिरसाट म्हणाले. 


संजय राऊत यांच्यावर टीका 


दरम्यान यावेळी बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत घाणेरड्या राजकारणातला कीडा आहे. त्यांना त्यांची जागा नाना पटोले यांनी दाखवली आहे. त्यामुळे आता त्यांना फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोडे मारायचं बाकी आहे. तर आता महाविकास आघाडीची सभा होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांना संजय राऊत सांगतील युद्धभूमीवर काय सुरु आहे, असेही शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalgaon NCP News : 'घड्याळाचे काटे सध्या ठिकाणावर नाहीत', भाजप खासदाराकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला भर कार्यक्रमात टोला