एक्स्प्लोर

दारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे.

लातूर : शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत तयारी सुरु होती. मात्र डोंगरज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षक दारु पिऊन शाळेत आले. संग्राम बिराजदार आणि धनाजी दडिमे अशी या शिक्षकांची नावे आहेत. डोंगरज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 शिक्षक आहेत. यात पाच महिला शिक्षिका आहेत. आठवीपर्यंतच्या या शाळेत 307 विद्यार्थी ज्ञानर्जन करत आहेत. परंतु आज सकाळी परिपाठ सुरु होण्यापूर्वीच हे दोन दारुडे शिक्षक खूप दारु पिऊन शाळेत आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दोन्ही दारुडे इतर शिक्षकांना शिवीगाळ करु लागले. त्यानंतर या घटनेची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकारी तात्काळ घटनस्थळी आले तरिही या शिक्षकांची दारु उतरली नव्हती. दोन्ही दारुड्या शिक्षकांनी अधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. तसेच अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. त्यानंतर औटपोस्ट करडखेल येथील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शाळेत जाऊन दडीमे आणि बिराजदार या दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतले. गटशिक्षणाधिकारी वंदणा फुटाणे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे. या दोन दारुड्या शिक्षकांमुळे शाळा बदनाम होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच भास्कर कुलकर्णी यांनी मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : खळबळजनक! अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद कॅमेऱ्यात कैद, विद्यार्थाला अटक
खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद कॅमेऱ्यात कैद, विद्यार्थाला अटक
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Aaditya Thackrey On Sachin Ahir: ठाकरेंची साथ सोडली पण वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिरांचा शब्द, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
ठाकरेंची साथ सोडली पण वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिरांचा शब्द, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Sachin Ahir on Aditya Thackeray: आदित्य आणि उद्धव ठाकरे तुम्हाला रोज भेटत होते, मग ठाकरेंना का सोडलं?, सचिन अहिर यांनी कारण सांगितलं...
आदित्य आणि उद्धव ठाकरे तुम्हाला रोज भेटत होते, मग ठाकरेंना का सोडलं?, सचिन अहिर यांनी कारण सांगितलं...

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Embed widget