एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी रस्ते अपघातांचं खापर वाहनचालकांवरच फोडलं

देशातील अपघाती मृत्यूंबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून अपघात रोखण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला होता.

नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने खापर वाहनचालकांवरच फोडलं आहे. मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 2014 पासून झालेल्या अपघातात 938 जणांचा जीव गेला, तर 2322 जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, हे अपघात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाले नसून वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे, धोकादायक ओव्हरटेक आणि अविचाराने, हयगयीने वाहन चालवल्यामुळे झाल्याचे अजब तर्कट राज्य सरकारने मांडलं आहे. रस्ते अपघाताबाबत भाजपच्या अतुल भातखळकर यांच्यासह 20 सदस्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. देशातील अपघाती मृत्यूंबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून अपघात रोखण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. राज्यात 2017 मध्ये 35 हजार 853 अपघातात झाले, ज्यात 12 हजार 264 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हजार 465 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली. 2018 च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात राज्यात 9243 अपघात झाले असून त्यात 3361 लोकांचा मृत्यू झाला. शहरी भागातील अपघातांचं प्रमाण 27 टक्के असून मृत्यूचं प्रमाण 17 टक्के आहे. तर, ग्रामीण भागातील अपघातांचं प्रमाण 73 टक्के आणि मृत्यूचं प्रमाण 83 टक्के आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2015 च्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो, असेही या उत्तरात नमूद करण्यात आलं. मुंबईतील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण – मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील 304 पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचं काम पूर्ण झालं आहे. 304 पैकी 114 पूल सुस्थितीत असून 111 पुलांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. 18 पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असून 61 पुलांना मोठ्या दुरुस्तीची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पुलांबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ऑडिटचं काम पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय, अहवालानुसार पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियाही सुरु केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

Embed widget