एक्स्प्लोर
राज्य साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती
डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सदस्यपदी 35 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती राज्य साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह अन्य 35 नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. विचारवंत डॉ.मोरे हे यापूर्वी पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सदस्यपदी कलावंत गिरीष प्रभूणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, लेखक अरुण शेवते, भारत ससाणे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलीया कार्व्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ, विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए.के.शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ. रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरुण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देवीदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रुद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांच्यासह 35 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
आणखी वाचा























