एक्स्प्लोर

18 वर्षांखालील लहान मुलांसाठीही आता 'दीक्षित डाएट'

18 वर्षांखालील लहान मुलांनी दिवसातून चार वेळा जेवण करावं आणि गोड कमी खावं, असा सल्ला डॉ. जगन्नाथ दीक्षितांनी दिला आहे. मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्यामुळे दीक्षित डाएट प्लॅन तयार करण्यात आला आहे.

नाशिक : देशभरात प्रसिद्ध झालेलं 'दीक्षित डाएट' आता 18 वर्षांखालील मुलांनाही फॉलो करता येणार आहे. मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा, आळस याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी लहानग्यांसाठीही नवीन प्लॅन तयार केला आहे. दीक्षित यांनी आजपर्यंत 18 वर्षांखालील मुलांसाठी कोणताही डाएट प्लॅन तयार केला नव्हता. 18 वर्षांखालील मुलांनी दिवसातून चार वेळा जेवण करावं आणि गोड कमी खावं, असा सल्ला दीक्षितांनी दिला आहे. मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्यामुळे दीक्षितांनी हा नवीन प्लॅन तयार केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण कोल्ड्रिंक्स पिण्याला अधिक पसंती देत असतात. मात्र हेच कोल्ड्रिंक्स आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कोणीही कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका, असा सल्ला जगन्नाथ दीक्षित यांनी नाशिकमध्ये दिला. नाशिकच्या कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळी 'वॉक विथ जगन्नाथ दीक्षित' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो नाशिककरांसोबतच दीक्षित फॉलोअर्सनी यात सहभाग घेतला होता. नाशिककरांनी दीक्षितांना डायबेटीस, ब्लड प्रेशरसोबतच वजन कमी करण्याचे उपाय यावेळी विचारले. दीक्षित यांनीही त्यांच्या प्रश्नांचं सखोल निरसन केलं. माझा कट्टा | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत आरोग्यदायी डाएटकट्टा लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना राज्य सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं आहे. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाल्यावर अनेक जणांनी त्याचं अनुकरण सुरु केलं. डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. स्थूलतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हेल्थ टिप्स शारीरिक स्वास्थ्याचं आहाराशी असलेल्या नात्याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून 'दीक्षित डाएट प्लॅन' नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak : संशयास्पद चॅट्स अन् 'GOD' नावाचा नंबर; मनीषा हवालदारच्या पतीचा मोबाईलमध्ये सापडली चॅटिंग, व्हॉट्सॲप मेसेजेस डिलीट
संशयास्पद चॅट्स अन् 'GOD' नावाचा नंबर; मनीषा हवालदारच्या पतीचा मोबाईलमध्ये सापडली चॅटिंग, व्हॉट्सॲप मेसेजेस डिलीट
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Kantara Fame Actress Rukmini Vasanth Deepfake Video: 'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेकचा तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
NEET Paper Leak Pune Crime : मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
Maharashtra Weather : अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
Embed widget