संगमनेर : ‘आयुर्वेदिक गर्भसंस्कार’ या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करुन प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनटीडी) भंग केल्यानं संगमनेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

याप्रकरणी प्रसिद्ध आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबे, पुस्तकाचे प्रकाशक अभिजीत पवार आणि अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक सखाहरी सोनावणे यांना 9 जूनला सर्व कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

या सर्वांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, चार महिने उलटूनही काहीही कारवाई न झाल्यानं तक्रारदार गणेश बोऱ्हाडे यांनी संगमनेर न्यायालयात धाव घेतली.