यवतमाळ : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झालं. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांगणात अरुणा ढेरे यांनी मुक्तसफर केली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमधील पोस्टल मैदानावर होणार आहे. 11, 12 आणि 13 जानेवारी 2018 असे तीन दिवस साहित्याचा मेळा यवतमाळमध्ये भरणार आहे.

पहिल्यांदाच साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या नाहीत. सर्वानुमते संमेलनाध्यक्षाची निवड करण्याचे साहित्य महामंडळाने ठरवले होते. त्यानुसार डॉ. अरुण ढेरे यांची एकमताने निवड झाली.

अरुणा ढेरे यांचा थोडक्यात परिचय

पिता आणि गुरुच्या रूपात लाभलेली, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांची कृपा-साऊली, घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांचा सहवास आणि साहित्याने भारावलेलं एक विलक्षण वातावरण! त्यात भर म्हणून शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व, मानवी नात्यांतील आर्तता शोधणारी त्यांची संवेदना, आणि एका मातब्बर 'स्टोरीटेलर'चं उपजत 'टायमिंग'... डॉ. अरुणा ढेरे आपल्या लेखनाने वाचकाला मंत्रमुग्ध करणार हे ठरलंच होतं.

सहा कवितासंग्रह, तीन कादंबरी, सहा कथा संग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. ढेरे या 21 व्या शतकपूर्वीच्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या प्रतिभेची ओळख पटते.

त्यांचा 'विस्मृतिचित्रे' हा ग्रंथ अतिशय गाजला. त्याच बरोबर 'अंधारातील दिवे', 'उंच वाढलेल्या गवताखाली' सारखी वैचारिक पुस्तकं; 'निरंजन', 'प्रारंभ','यक्षरात्र', यांसारखे कविता संग्रह; कृष्णकिनारा','नागमंडल','मैत्रेय' यांसारखेकथासंग्रह वाचकांच्या वाङ्मयीन प्रवासातील श्रद्धास्थानं बनली आहेत.

डॉ. अरुणा ढेरे यांचं साहित्यविश्व :

वैचारिक पुस्तके :

अंधारातील दिवे
उंच वाढलेल्या गवताखाली
उमदा लेखक -उमदा माणूस
उर्वशी
कवितेच्या वाटेवर
काळोख आणि पाणी
कवितेच्या वाटेवर
जाणिवा जाग्या होताना
जावे जन्माकडे
त्यांची झेप त्यांचे अवकाश
पावसानंतरचं ऊन
प्रकाशाचे गाणे
प्रतिष्ठेचा प्रश्न
प्रेमातून प्रेमाकडे
महाद्वार
लोक आणि अभिजात
लोकसंस्कृतीची रंगरूपे
विवेक आणि विद्रोह
डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’
विस्मृतिचित्रे
शाश्वताची शिदोरी
शोध मराठीपणाचा' (सुभाष केळकर यांच्याबरोबर सहलेखन-मुख्य लेखक - दिनकर गांगल)
स्त्री आणि संस्कृती

कविता संग्रह :
निरंजन
प्रारंभ
मंत्राक्षर
यक्षरात्र
बंद अधरो से (हिंदी)

कथासंग्रह :
अज्ञात झर्‍यावर
काळोख आणि पाणी
कृष्णकिनारा
नागमंडल
प्रेमातून प्रेमाकडे
मन केले ग्वाही
मनातलं आभाळ
मैत्रेय
रूपोत्सव
लावण्ययात्रा
वेगळी माती
वेगळा वास