एक्स्प्लोर

सहलीच्या बसचा अपघात, तिघांचा मृत्यू, 20 विद्यार्थी जखमी

अहमदनगर येथील डॉन बॉस्को शाळेची सहल परतत असताना बसचा मोठा अपघात झाला आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर लक्झरी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

अहमदनगर : येथील डॉन बॉस्को शाळेची सहलीला गेलेली बस परतत असताना बसचा मोठा अपघात झाला आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर लक्झरी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दोन्ही वाहनांच्या इंजिन्सनी पेट घेतला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका शिक्षकाचा, बस क्लिनरचा आणि पिकअप चालकाचा समावेश आहे. तसेच 15 ते 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पुण्याच्या पिंपरी-पेंढार गावाजवळ गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. आनंद ट्रॅव्हल्सच्या बसमधून गेलेली डॉन बॉस्को शाळेची सहल कल्याणहून नगरकडे परतत होती. त्याचवेळी कांद्याची वाहतूक करणारा पिकअप हा आळेफाट्याहून कल्याणचा दिशेला निघाला होता. तेव्हाच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या इंजिन्सने जागीच पेट घेतला. आग वेळीच विझली खरी मात्र जोराची ठोकर बसल्याने पिकअप चालक, बस क्लिनर आणि शाळेच्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील 47 विद्यार्थ्यांपैकी 15 ते 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दुसरीकडे या अपघातामुळे पिकअपमधील शेकडो किलो कांदा रस्त्यावर पसरला. अपघातामुळे रात्री उशिरापर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ओतूर पोलिसांनी प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. अपघात नेमका कोणाच्या चुकीने झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget