त्यासाठी तुम्हाला मतदान करुन त्याचा सेल्फी पाठवायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला मालमत्ता करात 25 टक्क्यांची सुट मिळेल. महानगरपालिका झाल्यापासून पनवेलमध्ये यंदा पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.
प्रत्येक प्रभागात पाच अशा प्रकारे 100 मतदारांना ही सूट देण्यात येईल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निवडणूक होत असल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने हा उपक्रम सुरु केला आहे.
पनवेलसोबतच मालेगाव आणि भिवंडी महापालिकेची निवडणूक होत आहे. 24 मे रोजी मतदान होणार आहे, तर 26 मे रोजी मतमोजणी होईल.
पनवेल महापालिका निवडणूक कार्यक्रम :
- अर्ज दाखल करण्याची तारीख : 29 एप्रिल ते 6 मे
- अर्ज छाननी तारीख : 8 मे
- चिन्ह वाटप : 12 मे
- मतदानाची तारीख : 24 मे
- मतमोजणी : 26 मे
संबंधित बातम्या :