रायगड : विरोधकांच्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेही या यात्रेत सहभागी होणार आहेत.


नारायण राणे चिपळूणपासून संघर्षयात्रेत सहभागी होतील. गेल्या तीन टप्प्यात नारायण राणे संघर्षयात्रेमध्ये सहभागी झाले नव्हते. 'विरोधकांची संघर्षयात्रा फसली', अशी शब्दात नारायण राणेंनी टीका केली होती.

शेतकऱ्यांच्या समस्यांसह राज्यातील विविध प्रश्नांना अजेंडा बनवत विरोधकांनी एकत्र येऊन संघर्षयात्रेला 29 मार्च रोजी चंद्रपुरातून पहिल्या टप्प्याची सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथून सुरुवात झाली होती. तर संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा 25 एप्रिल रोजी कोल्हापुरातून सुरु झाला होता.

आता नारायण राणे यांच्या सहभागामुळे संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्यात विरोधक किती आक्रमक होतात आणि सरकारचा विरोधकांना कसा प्रतिसाद असेल, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

संबंधित बातम्या

एसी बसमधून संघर्षयात्रा, विरोधी पक्ष चंद्रपुरात दाखल


विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तारीख ठरली !


संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा!