मुंबई : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे सामान्य नागरिकांना मिळालेला दिलासा अल्पायुषी ठरला आहे. कारण पेट्रोल, डिझेल स्वस्त होताच राज्य सरकारने सर्वसामान्यांना झटका देत, इंधनावरील सरचार्ज एक रुपयांनी वाढवला आहे.


परिणामी, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर केवळ एक रुपयानेच घटले आहेत.

तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल 2 रुपये 16 पैसे आणि डिझेलच्या दरात 2 रुपये 10 पैशांनी कपात केली होती. परंतु राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा इंधनावरील अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला.

मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे अवघ्या 24 तासात राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर फक्त एक रुपयानेच कमी झाले आहेत.

एकीकडे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला, पण राज्य सरकारने मात्र अधिभार वाढवून पुन्हा झटका दिला आहे.

संबंधित बातम्या:

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, ग्राहकांना दिलासा

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महागलं

इंधनात महा’ग’राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात!

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात