मुंबई : मुंबई- कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये लावलेल्या रोषणाईला मनसे (MNS) विरोध केला आहे. 'जश्न ए दिवाली' (Jashn - E- Diwali) लिहिलेल्या बोर्डला मनसेचा विरोध आहे. हिंदू सणाला जश्न-ए-दिवाळी अशा उर्दूतून शुभेच्छा देत (Diwali 2023) त्याची बदनामी करत असल्याचा आरोप चांदिवली विभागाचे प्रमुख मनसे महेंद्र भानुशाली यांनी केला. मनसेच्या विरोधानंतर फिनिक्स मॉलनं 'जश्न ए' शब्द काढला.
दिवाळीच्या निमित्ताने जश्न-ए-दिवाळी हा हॅशटॅग मॉलच्या मध्यभागी लावणयात आला. गरज नसताना दिवाळीसारख्या हिंदू सणाला मुस्लिम विचारधारेशी जोडल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर महेंद्र भानुशाली यांनी जोरदार टीका केली. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये चांगल व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, आमचे हिंदू सण आले की काय वाईट सगळ्यांना गंमत वाटते. "हिंदू सणाची मुद्दामहून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जश्न ए दिवाळी वापरण्यात आले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाली की शुभकामनाएं, हॅपी दिवाली हे समजू शकतो पण जश्न ए दिवाळी हा काय प्रकार आहे. आम्ही कोणत्या धर्माचा अपमान करायचा नाही. ज्या पद्धतीने आमच्या सणांसाठी ऊर्दू शब्द वापरला जातो त्याप्रमाणे इतर धर्मांच्या सणांसाठी जय श्रीराम असे हॅश टॅग लिहिले आहे का? असे म्हणत मॉलमध्ये लावण्यात आलेला हॅश टॅग मगे घेण्यात आला आहे.
दिवाळीसोबत ऊर्दू नाव जोडणे विकृत मानसिकता
कुर्ला फिनिक्स मॉल मध्ये लावण्यात आलेल्या जश्न ए दिवाली लायटिंगचा मनसेने विरोध केला. महेंद्र भानुशाली मनसे विभाग प्रमुख चांदीवली यांनी या लाइटिंगचा विरोध केला. महेंद्र भानुशाली यांनी लिहिलेला लायटिंग बोर्ड काढण्याच भाग पाडलं महेंद्र भानुशाली यांच्या विरोधानंतर फिनिक्स मॉलने स्वतः जश्न ए शब्द काढून टाकलं. महेंद्र भानुशाली यांच्या विरोध करत असताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदू सणांसाठी विदेशी भाषा वापरणे आपल्या संस्कृतीला नष्ट करण्यासारखे आहे. दिवाळीसोबत ऊर्दू नाव जोडणे विकृत मानसिकता आहे, असे भानुशाली म्हणाले.
गेल्या वर्षी 'जश्न-ए-रिवाज' कॅम्पेनवर भडकले होते नेटकरी
गेल्या वर्षी देखील फॅब इंडियाने त्यांच्या दिवाळी कॅम्पेनचे नाव 'जश्न-ए-रिवाज' कॅम्पेनवर नेटकरी भडकले होते. फॅब इंडियाच्या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर #BoycottFabIndia हा ट्रेन्ड सुरु झाला. अनेकांनी यावर आपलं मत व्यक्त करत कंपनीच्या जाहिरातीवर चांगलीच टीका केली. त्यानंतर कंपनीने त्यांच्या साईटवरून ही जाहिरात काढली आणि इतर ठिकाणाहूनही जाहिरात मागे घेतली होती.
पाहा व्हिडीओ :