सांगली : आई-वडिलांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त लाखो रुपयांची पुस्तके वाटण्याचा उपक्रम सांगली जिल्ह्यातील तासगावमधील म्हेत्रे कुटुंबाने राबवला. तासगावमधील पहिली ते दहावीतील जवळपास 28 शाळांना आणि एका ग्रंथालयाला पुस्तके देण्यात आली.
यामध्ये गोष्टी, बाल वाङमय, कथा, कादंबरी अशा पुस्तकाचा समावेश आहे. शाळकरी विद्यार्थी आणि ग्रंथालयातील वाचकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
रामचंद्र धोंडीराम म्हेत्रे आणि रुक्मिणी बाबुराव म्हेत्रे या दोघांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ तासगावमधील म्हेत्रे मळ्यात हा पुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तासगाव शहरातील नगरपालिका, खाजगी अशा जवळपास 28 शाळांतील विद्यार्थी ही पुस्तके घेण्यासाठी म्हेत्रे मळ्यात आले होते.
प्रगतीशील बागायतदार म्हणून ओळख असलेल्या नारायण म्हेत्रे आणि अनिल म्हेत्रे यांनी या आपल्या कुटंबातील मयत व्यक्तींच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ पुस्तक दिनाच्या दिवशीच हा अनोखा पुस्तक वाटपाचा उपक्रम राबवला.
शहरातील शाळांबरोबरच एका ग्रंथालयालाही पुस्तके दिली गेली. शाळांचा जेवढा पट आहे, तेवढी पुस्तके वाटप करण्यात आली. अशा एकूण सात हजार पुस्तकांचं वाटप करण्यात आलं, ज्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
आई-वडिलांच्या श्राद्धाला लाखो रुपयांच्या पुस्तकांचं वाटप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 03:19 PM (IST)
तासगावमधील पहिली ते दहावीतील जवळपास 28 शाळांना आणि एका ग्रंथालयाला पुस्तके देण्यात आली. यामध्ये गोष्टी, बाल वाङमय, कथा, कादंबरी अशा पुस्तकाचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -