मुंबई : दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय (Directorate of Archeology and Museums) संचालक तेजस गर्गे आणि नाशिकच्या (Nashik Crime) सहाय्यक संचालिका आरती आळे (Aarti Ale) यांच्याविरोधात नाशिक एसीबीने (Nashik ACB) गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराला कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती. आळे यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे (Tejas Garge) यांचा देखील हिस्सा असल्याचे समोर आले होते. आता राज्य सरकारने (Maharashtra Government) या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. राज्य सरकारने तेजस गर्गेंचे थेट निलंबन (Tejas Garge suspended) केले आहे. 


तेजस गर्गे नॅाट रिचेबल 


नाशिक (Nashik) येथील बांधकाम व्यावसायिकाला पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी दीड लाख रुपयाची लाच घेवून पुरातत्व विभागाची परवानगी दिली होती. या प्रकरणी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा ठाण्याचे भाजपा आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार करुन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी विभागीय चौकशीत तेजस गर्गे यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तेजस गर्गे यांना निलंबित करण्यात आले आहे. तेजस गर्गे सघ्या नॅाट रिचेबल असून त्यांचा ठांगपत्ता लागलेला नाही. 


तेजस गर्गेंना अटकपूर्व जामीन मंजूर


दरम्यान, तक्रारदाराकडून लाच घेण्यास महिला सहकाऱ्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना उच्च न्यायालयाने (High Court) सशर्त अटकपूर्व जामीन दिला आहे. 7 मे रोजी विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती आळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यात आळे यांच्याकडून लाचेतील वाटा स्वीकारण्याचे गर्गे यांनी मान्य केल्याचे पुरावे विभागास मिळाल्याने त्यांनी गर्गे विरोधातही गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल होताच डॉ. गर्गे फरार झाले. जिल्हा न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने डॉ. गर्गे यांना अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान?; छगन भुजबळांचं आश्चर्यकारक उत्तर, काँग्रेसलाही ओढलं


Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही, राज ठाकरेंची विधानसभेसाठी पहिली गर्जना, 200-225 जागांची तयारी!