एक्स्प्लोर
भाजप नेते चरेगावकरांकडून महिला पोलिसाला शिवीगाळ?
सातारा : सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये निवडणुक केंद्रावर महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि महिला पोलिसामध्ये वादावादी झाली. चरेगावकर यांनी महिला पोलिसांला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
उमेदवार किंवा मतदार नसताना तुम्ही मतदान केंद्रावर का आलात, असा सवाल महिला पोलिसाने केला. यावर संतापलेल्या चरेगावकर यांनी माझ्या गाडीला मंत्रालयात कोणी अडवत नाही, तुम्ही अडवणारे कोण, अशा शब्दात उत्तर दिलं.
या वादावादीत चरेगावकर यांनी शिवीगाळही केल्याचा आरोप महिला पोलिसाने केला आहे. घडलेल्या प्रकारावेळी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकरही उपस्थित होते. मात्र त्यांनी काहीही ठोस भूमिका न घेता महिला पोलिसाला शांत बसण्यास सांगितलं.
दरम्यान चरेगावकर यांनी महिला पोलिसानेच आपल्याला शिवीगाळ केली, असा प्रतिदावा 'माझा'शी बोलताना केला आहे. आपण महिला पोलिसाला कसलाही अपशब्द वापरला नसल्याचं स्पष्टीकरण चरेगावकर यांनी दिलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement