धुळे : धुळे आणि नंदुरबार विधान परिषद पोट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 12 मार्च हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विधान परिषद निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. देशासह राज्यात कोरोनाग्रस्त आढळले असून सध्या महाराष्ट्रात 11 कोरोनाग्रस्त आहेत.
विधान परिषदेच्या या निवडणुकीवरही कोरोनाचे सावट दिसले. महाविकास आघाडीचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी मास्क लावूनच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या तोंडाला मास्क बांधलेला होता.
महाविकास आघाडी तर्फे शहादा येथील काँग्रेसचे अभिषेक पाटील यांचा अर्ज म्हणजेच, नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेले चंद्रकांत रघुवंशी यांनी कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याचे पाहायला मिळाले रघुवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करताना देखील मास्क लावूनच उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसचे अभिषेक पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपतर्फे माजी मंत्री अमरिश पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप पक्षातर्फे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे माजी रोजगार हमी, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, अमरीशभाई रसिकलाल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 13 मार्चला अर्जाची छाननी होणार आहे. तर 16 मार्च हा निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस असणार आहे. 30 ंमार्च रोजी धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोट निवडणुक होणार आहे. तर 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
Dhule ZP Election Result : धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता
Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावी
ZP Election : राज्यातील सहा जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर, महाविकासआघाडीची सरशी
शिवसेनेच्या दोन नाराज आमदारांकडून जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचाच पराभव?