एक्स्प्लोर
धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान
धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरु होईल.

मुंबई : धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवार, 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत. अहमदनगर महानगरपालिकेची मुदतही 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडणूक कार्यक्रम • नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : 13 ते 20 नोव्हेंबर 2018 • नामनिर्देशनपत्रांची छाननी : 22 नोव्हेंबर 2018 • उमेदवारी मागे घेणे : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत • निवडणूक चिन्ह वाटप : 27 नोव्हेंबर 2018 • मतदान : 9 डिसेंबर 2018 • मतमोजणी : 10 डिसेंबर 2018 • निकालाची राजपत्रात प्रसिद्धी : 13 डिसेंबर 2018 पर्यंत
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















