Dharashiv News : धाराशिवमधील (Dharashiv) कळंबमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे (St Employees) प्रश्न मार्गी लागावेत म्हणून एक कर्मचारी चक्क मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत होता. मात्र मागण्या मान्य करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर तब्बल अकरा तासानंतर हा आंदोलक एसटी कर्मचारी टॉवरवरून खाली उतरला आहे. या कर्मचाऱ्याचं नाव आहे सच्चिदानंद पुरी. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा या मागणीसाठी सकाळी सहा वाजता सच्चिदानंद पुरी हे टॉवरवर चढले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारातील कर्मचारी सच्चिदानंद पुरी शहरातील बीएसएनएलच्या 200 फुट उंच टॉवरवर चढून बसले होते. आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पुरी सकाळपासून टॅावरवर चढून बसले होते. सव्वा वर्ष आंदोलन करुन 124 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावून ही एसटी कर्मचाऱ्यांचे (St Employees) विलनीकरण झाले नाही. म्हणून सच्चिदानंद पुरी हे सकाळीच बीएसएनएल टॉवरवर चढून स्वतःच्या गळ्याला गळफास लावून बसल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हयरल झाला. सच्चिदानंद पुरी हे टॉवरवर चढल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी, पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचले होते. 


खोत आणि पडळकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर केला : सच्चिदानंद पुरी 


टॉवरवर चढल्यानंतर सच्चिदानंद पुरी यांनी खोत-पडळकर आणि सदावर्ते यांच्यावर आरोप केले होते. खोत आणि पडळकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांचा (St Employees) वापर केला. तर सदावर्ते यांनी वकिलीच्या नावाखाली पैसे लुबाडले असून केवळ आपली दुकानदारी चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचा आरोप ही त्यांनी केला. आता यांच्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नसून. राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्याने घेतला होता. गेल्या 11 तासांपासून हा कर्मचारी (St Employees) टॉवरवर 250 फूट उंचीवर जाऊन बसला होता. महामंडळातील प्रशासन आणि पोलीस महसूल प्रशासनाने विनवणी केली तरी खाली उतरला नाही. मागण्या मान्य होत नाही तोवर खाली उतरणार नसल्याचं ते म्हणाले होते. अखेर प्रशासनाने त्यांना मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलं असता ते तब्बल 11 तासानंतर खाली उतरले आहेत. दरम्यान, सच्चिदानंद पुरी यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग असतो. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्यात पुरी सहभागी होते.