Chhatrapati Sambhajinagar : जी-20 परिषदेच्या (G-20 Conference) निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar City) प्रशासनाने मोठी तयारी केली होती. तर यासाठी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाला मोठा खर्च आला आहे. दरम्यान असे असताना शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावरील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) सिमेंट व प्लॉस्टीक च्या कुंड्यांना एका कारने धडक देऊन महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी थेट पोलिसात धाव घेतली असून, गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहे. 


दरम्यान याबाबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्य उद्यान अधिकारी यांनी जवाहर कॉलनी पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, जी-20  परिषदे निमित्त महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडुन विविध विकास व सुशोभिकरणाची कामे करण्यात आली आहे. या कामांतर्गत सेव्हन हिल उड्डाणपुलावरील रस्ता दुभाजकावर शोभिवंत झाडांसह सिमेंट व फायबरच्या कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान आज (01 फेब्रुवारी) रोजी मारोती अल्टो (MH-20-EY-0194) या चारचाकी वाहनाने दुभाजकास धड़क देऊन दुभाजकांवर ठेवलेल्या सिमेंट व फायबरच्या प्रत्येकी 08 कुंड्या तोडुन वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. 


तर महानगरपालिकेने सुशोभिकरण अंतर्गत रितसर निविदा मागवुन सदर कुंड्या (शोभिवंत रोपे/झाडांसह) कंत्राटदाराकडून पुरवठा करुन घेतल्या आहेत. त्यानुसार शोभिवंत झाडांसह सिमेंट व फायबरच्या प्रत्येकी आठ अशा एकुण सोळा कुंड्या खरेदीची किंमत 82 हजार 984 रुपये इतकी आहे. त्यामुळे या वाहनमालका विरुध्द कारवाई करावी. तसेच महानगरपालिकेचे झालेले आर्थिक नुकसान रुपये 82 हजार 984 इतकी वसुली संबंधीताकडुन करुन घ्यावी व सदर रक्कम महानगरपालिकेस वर्ग करावी, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. 


आता देखभाल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान! 


जी-20 निमित्ताने राज्य सरकराने स्थानिक प्रशासनाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे शहरातील अनेक विकास कामांना गती देण्यात आली. सोबतच शहरात मोठ्याप्रमाणावर सुशोभीकरण करण्यात आले. रस्ते चकचकीत करण्यात आले. ठीकठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली. होर्डिंग, कुंड्या, रोषणाई करण्यात आली. त्यामुळे शहराचे रुपडे पलटले असून, विदेशात आल्यासारखे वाटत आहे. पण आता जी-20 परिषदेच्या बैठका संपल्या आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची देखभाल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. तर तेवढीच जबाबदारी शहरवासीयांची देखील असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


G-20 Conference: बीबी का मकबरा पाहून जी 20 परिषदेचे शिष्टमंडळ भारावून गेले