Dhananjay Munde: राज्यात मागील काही दिवसांपासून महायुतीत संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या. मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात दौऱ्यावर असणारे महायुतीतले नेते नकार देत असताना राष्ट्रवादीकडून भाजप शिंदे गटाची कोंडी केली जाते अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची ते. आम्ही आधी जागा निश्चित करू मग उमेदवार जाहीर करू असं कृषीमंत्री धनंजय मुंडे (dhananjay Munde) म्हणालेत. विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगत विनाकारण आम्हाला घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले.


दरम्यान मागील दोन दिवसांपासून अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱ्याच्या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं मदत कधी मिळणार असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. ऑगस्ट महिन्याअखेरीस झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतरही शेतकऱ्यांची पिकं पाण्यात गेली होती. यानंतर सरकारी तिजोरीतून 300 कोटींचा निधी देण्यात आला होता. आता मागील काही दिवसांपासून पुण्यात जोरदार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या भागात नुकसान झाले तिथे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर लवकरच आर्थिक मदत केली जाईल असं ते म्हणाले. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पुण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान कांदा निर्यातीच्या दरानंतर झालेल्या शेतकऱ्यांच्या कोंडीसह मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तसेच बदलत्या राजकारणावरही पुण्यातील खेडमधून कृषीमंत्री मुंडे बोलत होते. 


राष्ट्रवादीकडून भाजप शिंदे गटाची कोंडी केली जाते का? 


मागील काही दिवसांपासून महायुतीत संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यावर मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात दौऱ्यावर असणारे महायुतीतले नेते नकार देत असताना राष्ट्रवादीकडून भाजप शिंदे गटाची कोंडी केली जाते अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर महायुती एकसंघ आहे असं कृषिमंत्री  धनंजय मुंडे म्हणालेत. आमचं ठरलंय कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवायची ते. विनाकारण आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्वात आधी आम्ही जागा निश्चित करू आणि त्यानंतर उमेदवारांची ही घोषणा करू असं धनंजय मुंडे म्हणाले. मला महायुतीत स्थान नाही असं पंकजाताई बोलल्याचं तर मला माहित नाही मी त्यांना विचारतो नेमकं काय म्हणाल्या असंही धनंजय मुंडे म्हणाले.


परतीच्या पावसात झालेल्या नुकसानाची भरपाई कधी?


राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही भाग व पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं होतं. या ठिकाणी मदत देण्याचाही निर्णय झालाय. तीनशे कोटींचा निधी देण्यात आला. आता पुण्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालं तिथे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. तिथेही लवकरच आर्थिक मदत केली जाईल, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.


कांदा निर्यात केल्याने भाव पडले?


अफगाणिस्तानचा कांदा निर्यात केल्याने कांद्याचे भाव पडले ही बातमी खोटी आहे की खरी याबाबत मला आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही. अगोदर केंद्र सरकारशी बोलावं लागेल. त्यामुळे कांदा आयात केल्याच्या बातमीबद्दल माहिती घेऊन संध्याकाळी बोलतो,असं कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणालेत.