मुंबई : जोपर्यंत शेतकर्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही बजेट मांडू देणार नाही, असे म्हणणारे शिवसेनेचे मंत्री आता शांत का झाले आहेत, ते समजत नाही, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. कर्जमाफीसोर वाघ शांत झाल्याचा घणाघातही धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर केला.
“जोपर्यंत शेतकर्याची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही बजेट मांडू देणार नाही, असे म्हणणारे शिवसेनेचे मंत्री आता शांत का झाले, ते समजत नाही. शिवसेना आता दुहेरी भुमिका का घेत आहे? सत्तेत राहायचं आणि कर्जमाफीची मागणी करायची, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. शिवसेनाचा वाघ आज शेतकर्यांच्या कर्जमाफीसमोर शांत झाला आहे.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.
“परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या केलेल्या निवेदनानंतरही औरंगाबादमध्ये विष्णु बुरकुल या शेतकर्याने आत्महत्या केली.”, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना शाश्वत शेती देऊ. त्यांच्या ऊत्पादनात वाढ झालेली आहे. तरी देखील त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. हे सरकार शेतकरी धोरण आखत नाही.”, असेही मुंडे म्हणाले.
राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबवायचे असेल तर कर्जमाफी शिवाय दुसरा उपाय नाही, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.