ठाणे : सुरक्षेसाठी लाकडी किंवा फायबर काठी घेऊन फिरणाऱ्या पोलिसांच्या हाती आता ‘हायटेक काठी’ पाहायला मिळणार आहे. नाशिकमधील एका तरुणाने पोलिसांसाठी हायटेक काठी तयार केली आहे. चेतन नंदने असे या संशोधक तरुणाचे नाव आहे.
पोलिसांना अत्याधुनिक बनवण्यासाठी चेतन नंदनेचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच्या या प्रयत्नांना यशही मिळालं आहे. हॉलिवूडमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून चेतनला पोलिसांच्या हायटेक काठीची कल्पना सूचली. चेतन नंदने नाशिकमधील संदीप यूनिव्हर्सिटीत शिकतो. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात चेतन शिकतोय. हायटेक काठीचे फीचर्स –- जीपीएस
- टॉर्च
- मेटल डिटेक्टर
- कॅमेरा
- इलेक्ट्रिक शॉक
- बॅटरी