मुनगंटीवार यांनी विरोधकांचे चिमटे काढत, कधी कविता, कधी शेरो-शायरी सादर करत बजेट मांडलं.
मुनगंटीवारांनी यंदाचा 62 हजार 844 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकार 38 हजार 892 कोटी कर्ज यावर्षी काढणार आहे. त्यामुळे राज्यावरील एकूण कर्ज 4 लाख 13 हजार 44 कोटी रुपये असेल. तर महसुली तूट 4511 कोटी रुपये आहे.
काय महाग, काय स्वस्त
महाग -
- देशी विदेशी दारु महागली, कर वाढले
- ऑनलाईन, पेपर लॉटरी महागली, कर वाढवला
स्वस्त -
- स्वाईप मशीनवरील कर काढल्याने, मशीन्स स्वस्त
- मिल्क टेस्टींग किटवरचा कर काढला
- छोट्या शहरातील विमानतळांवरचे कर कमी केले
- ऊस खरेदी कर माफ केला जाणार
- शेततळ्यांकरता जिओमेंब्रेनवरील करमाफी
- सॉईल टेस्टींग किटवरील करमाफी
- विद्युतदाहिनी व गॅसदाहिनीवरचा करही शून्य
काय महाग, काय स्वस्त
- देशी विदेशी दारु महागली, कर वाढले
- स्वाईप मशीनवरील कर काढल्याने, मशीन्स स्वस्त
- ऑनलाईन, पेपर लॉटरी महागली, कर वाढवला
- मिल्क टेस्टींग किटवरचा कर काढला
- छोट्या शहरातील विमानतळांवरचे कर कमी केले
- ऊस खरेदी कर माफ केला जाणार
- शेततळ्यांकरता जिओमेंब्रेनवरील करमाफी
- सॉईल टेस्टींग किटवरील करमाफी
- विद्युतदाहिनी व गॅसदाहिनीवरचा करही शून्य
जीएसटी येईपर्यंत काही स्वस्त
जीवनावश्यक वस्तू - तांदूळ, गहू, डाळी, हळद मिर्ची, चिंच गूळ, नारळ, धणे, मेथी, पापड, ओला खजूर सोलापूरी चादर, आमसूल, बेदाणे, मनुका यावरील मुल्यवर्धित कर जीएसटीपर्यंत माफ
कर
- कुठलीही करवाढ प्रस्तावित नाही
- GST कराचे दर 0,5,12,18, 28
- 1 जुलैपासून GST लागू
4511 कोटी महसूल तूट येत आहे
कोणते कर वाढले, कोणते कमी झाले
अ) मूल्यवर्धितकर सवलत
- शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देता यावा याकरीता सन 2016-17 चा ऊस खरेदी कर माफ. सन 2015-16 च्या ऊस खरेदी करमाफीसाठीची साखर निर्यात अट काढण्यात आली.
- जीवनावश्यक वस्तू जसे तांदुळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ तसेच हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धणे, मेथी, सुवा, पापड, ओला खजूर यांचेवरील करमाफी सुरु ठेवणार. आमसुलास नव्याने करमाफी
- सोलापूरी चादर व टॉवेलवरील करमाफी सुरु ठेवणार
- शेततळयाकरीताचे जीओ मेमब्रेनवरील कर 6% वरुन 0%
- शेत जमिनीची उत्पादकता तपासण्याकरीता सॉईल टेस्टींग किटवरील विक्रीकराचा दर 13.5 % वरुन 0 %
- दुधातील भेसळ तपासण्याकरीता मिल्क टेस्टींग किटवरील विक्रीकराचा दर13.5 % वरुन 0 %
- रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम अंतर्गत शहरांच्या विमाम वाहतुकीस इंधनाचा कर दर 5 % वरुन 1%
- कॅशलेस व्यवहाराकरीता कार्ड स्वाईप मशीनवरील कर 13.5 % वरुन 0%
- गॅस व विद्युत दाहिनीवरील कराचा दर 13.5 % वरुन 0%
(ब) उद्योगास कर सवलत
- मधुमका प्रक्रिया उद्योगावरील दिनांक 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2016 पर्यत विक्रीकर माफ
- कापड प्रक्रिया उद्योगावरील मुल्यवर्धित कर दिनांक 8 एप्रिल 2011 ते 30 एप्रिल 2012 या कालावधीकरिता माफ. अंदाजित 200 उद्योगांस फायदा
- यार्न सायझिंग व वार्पिंग उद्योगांवरील मुल्यवर्धित कर दिनांक 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2016 पर्यंत माफ. अंदाजित 300 उद्योगांस फायदा
(क) करवृध्दी
- देशी व विदेशी मद्यावरील कलाम विक्री किमतीवर मुल्यवर्धित कराचा दर 23.08 % वरुन 25.93 %
- साप्ताहिक लॉटरीवरील कर रु. 70,000 वरुन रुपये 1 लक्ष
(ड) प्रशासकीय बदल
1.महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या तीन नवीन खंडपीठाची निर्मिती
2. मुल्यवर्धित कर कायद्यांतर्गत अपील दाखल करण्याकरिता रुपये 15 कोटी अधिकतम मर्यादेत 10 % अंशत: रकमेची आवश्यकता
3. खाजगी कंपनीच्या संचालकांकडून कंपनीची मुल्यवर्धीत कराची थकबाकी वसूल करता येणार
4. व्यवसाय कराअंतर्गत अनोंदीत कालावधीसाठी कराची आकारणी 4 वर्षापर्यत सीमित
5. एजंटची व्यवसाय कराची जबाबदारी त्यास नेमणा-या संस्थेवर
6. विविध कायद्याअंतर्गत असलेल्या शुल्क, दंड व कोर्ट फी रकमेचे पुनर्निरीक्षण
(इ) जीएसटी
- जीएसटी अंमलबजावणीकरीता राज्याची पूर्ण तयारी
- जीएसटी अंतर्गत सन 2015-16 च्या कर जमा महसुलावर वार्षिक 14 % वाढीवर आधारित नुकसानभरपाई मिळणार
- जीएसटी अंतर्गत मुंबईच्या जकात व स्थानिक संस्था कराची नुकसानभरपाई मिळणार
कामगार
- राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणी देता यावी यासाठी अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना
- केंद्राच्या धर्तीवर राज्य शासन आता भांडवली खर्चावर लक्ष केंद्रीत करणार, त्यामुळे प्रत्येक विभाग त्यांची तरतूद स्वतंत्रपणे वापरु शकेल.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस
सुरक्षा
- पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडसाठी एकच नंबर - 'डायल 112'
- पोलीस गृहनिर्माणासाठी 325 कोटींचा निधी
- रस्ते अपघात रोखण्यासाठी ३४ कोटी ८६ लाख निधी
- www.abpmajha.in
- नवी मुंबई, मिरा-भाईंदर, अमरावती, चंद्रपूरमध्ये सीसीटीव्ही बसवणार
डिजिटल महाराष्ट्र
- प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी, ई तंत्रज्ञानाच्या वापरासा माहिती तंत्रज्ञानाला 200 कोटींचा निधी
- सार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणार
- 2018 पर्यंत 28 हजार ग्राम पंचायती डिजिटल करणार
स्मारकं
- शिवाजी महाराज स्मारक- अरबी समुद्र
- शाहू महाराज - कोल्हापूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर - इंदू मिल, दादर
- बाळासाहेब ठाकरे - मुंबई
सर्व स्मारकांसाठी २०० कोटी
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं अहमदनगरमधील जामखेडमध्ये स्मारक बांधणार
- www.abpmajha.in
पर्यटन
- सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त २५ कोटी
- तसंच पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध सुविधांसाठी १०० कोटी
- पर्यटन स्थानच्या विकासासाठी 174 कोटी
- आषाढी एकादशी पंढरपूरवारी या अर्थसंकल्पसून 3 कोटी निधी निर्मल वारीसाठी
- www.abpmajha.in
- मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांसाठी 100 कोटींची विशेष तरतूद
- सार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणार
- गांधींजी - सेवाग्रामच्या वास्तव्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत - सेवाग्राम विकासाठी २६६. ५३ लाख रुपयाचा सेवाग्राम आराखडा होता त्यासाठी ९३.८० लाखची तरतूद
महिला
- महिला आयोगाला 7 कोटी 94 लाख
- अंगणवाडी बालकांना जेवणासाठी 310 कोटी,
- महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाख रुपये
- www.abpmajha.in
- शालेय विद्यार्थिंनींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी योजना
- कुपोषणासंदर्भातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढवत गरोदर व स्तनदा माता तसेच बालके यांच्या पोषण आहारात वाढ
धान खरेदी/ गोदामे
- आदिवासी विकास महामंडळामार्फत गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पालघर व ठाणे या पाच जिल्हयांमध्ये धानखरेदी व साठवणूकीसाठी 49 गोदामे भाडेतत्वावर उपलब्ध करणार
- शासकीय गोदामांची संख्या वाढवणार - त्यासाठी ८० कोटींची तरतूद
अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय
- स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूद
- अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 7 हजार 231 कोटी रु. निधीची तरतूद.
- चंद्रपूर येथील दिक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 200 कोटी
- शामराव पेजे कुणबी विकास 200 कोटी
- अल्पसंख्यांक 332 कोटी
- www.abpmajha.in
- राज्यातील अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात नागरी सुविधांसाठी - १२५ कोटी विशेष बाब
- अल्पसंख्याक उमेदावारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ८ कोटी
- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेसाठी 1 हजार 884 कोटी 99 लक्ष रु. निधीची तरतूद
- आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजना कार्यक्रमासाठी 6 हजार 754 कोटी रु. एवढा नियतव्यय प्रस्तावित
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांमध्ये उद्योजगता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने घोषित केलेल्या स्टॅण्डप इंडिया योजनेतंर्गत मार्जिन मनी देण्यासाठी 25 कोटी रु. निधीची तरतूद
- www.abpmajha.in
- विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी स्थापित विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजनांसाठी 2 हजार 384 कोटी रु. निधीची तरतूद
- विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन करणार
पर्यावरण
- पेंच, नागझिरा, नवेगाव अशा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी 80 कोटी तरतूद
- वन्य प्राण्यांचा पिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी योजना, 25 कोटींची तरतूद
- गावागावातील पर्यावरण विषयक योजनांसाठी- २० कोटी
- वन वणवे - चंद्रपूरात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण - ५ कोटी
- www.abpmajha.in
- मानव वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्यातून स्वखुशीने स्थलांतरीत होणा-या लोकांसाठी जमीन मोबदला बाजारभावाच्या 4 पट देण्याचा निर्णय, त्यासाठी 45 कोटी रु. निधीची तरतूद
- गेल्यावर्षीच्या विक्रमी वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याचा निर्धार, पुढील 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्षारोपण करण्याचे नियोजन, सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये 13 कोटी व सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करणार
नदी विकास
- नद्यांच्या शुद्धीकरणाचं काम प्राधान्याने हाती घेणार
- मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 990 कोटी 26 लाखांची तरतूद - अर्थमंत्री, केंद्राकडून 100 कोटी अर्थसहाय्य अपेक्षित आहे
आरोग्य
- मेडिकल कॉलेज इमारत बांधणीसाठी 559 कोटींची तरतूद
- औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार - १२६ कोटी
- कर्करोग - तीन प्रकारच्या कर्करोगांचे निदान व्हावे यासाठी - अद्ययावत यंत्रणा स्थापन होईल - ४३ कोटी
- सिटी स्कॅन मशीन ३१ रुग्णालयात मिळणार - त्यासाठी ७७ कोटी ५० लाख
- १३१६ कोटी - महात्मा फुले जीवनदायी योजना
- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान - २११ कोटी
- साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार
- www.abpmajha.in
- केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्यूवेशन व अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) योजनेसाठी 1 हजार 870 कोटी रु. निधीची तरतूद
- स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मुखकर्करोगांच्या निदानासाठी 253 शासकीय आरोग्य संस्थामध्ये मॅमोग्राफी मशीन, कोल्पोस्कोप व व्हेलस्कोप मशीन उपलब्ध करणार, यासाठी 43 कोटी रु. निधीची तरतूद
- सर्वसामान्य रुग्णांना अचूक रोगनिदानासाठी 31 रुग्णांलयांमध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करण्याचा निर्णय, यासाठी 77 कोटी 50 लक्ष रु. निधीची तरतूद
- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवत महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित, यासाठी 1 हजार 316 कोटी रु. निधीची तरतूद
- www.abpmajha.in
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील ग्रामीण जनता, महिला व बालके यांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी 1 हजार 549 कोटी रु. निधीची तरतूद
- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत 50 हजार पर्यत लोकासंख्या असलेल्या शहरांमध्ये उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 211 कोटी रु. निधीची तरतूद
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णांलयांचे बांधकाम तसेच बळकटीकरणासाठी 559 कोटी 30 लक्ष रु. निधीची तरतूद
- महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात आढळून येत असलेल्या माकडताप या रोगासाठी निदान उपचार, प्रशिक्षण व संशोधन यासाठी साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्हयात उभारण्याचा निर्णय
मेट्रो प्रकल्प
- मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटी,
- मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूद
- मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी एकत्रित 710 कोटी रु. निधीची तरतूद
- www.abpmajha.in
- मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या शिवडी न्हवाशिवा, नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेंट्रो हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील
उद्योग
- औद्योगिकदृष्टया मागासलेल्या भागास नवीन उद्योगांच्या निर्मितीसाठी पॅकेज स्कीम ऑफ इंन्सेटिव्हज् ही योजना राबविणार, यासाठी 2 हजार 650 कोटी रु. निधीची तरतूद
- सुक्ष्म, लघू व मध्यम औद्योगिक उपक्रमांची उत्पादकता उंचावण्यासाठी 60 कोटी रु. निधीची तरतूद
- www.abpmajha.in
- औद्योगिक समुह विकास योजनेतंर्गत गुंतवणूकदारांसाठी औरंगाबाद येथे जागा उपलब्ध, या योजनेसाठी राज्यशासनाचा सहभाग म्हणून 570 कोटी रु. निधीची तरतूद
सर्वांसाठी घर
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरं शहरी भागात बांधणार
स्मार्ट सिटी योजना
- स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी, सात शहरांचा समावेस
- www.abpmajha.in
पाणी
- ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूद
- मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद
- १६०५ कोटी स्वच्छ महाराष्ट्र अभियान
- ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत मार्च 2018 पर्यत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार, यासाठी 545 को7टी 66 लक्ष रु. निधीची तरतूद
- www.abpmajha.in
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत 500 नवीन पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्याचे नियोजन, यासाठी 300 कोटी रु. निधीची तरतूद
- शाश्वत व गुणवत्तापुर्ण पाणीपुरवठयासाठी जलस्वराज्य 2 या कार्यक्रमातंर्गत 39 निमशहरी गावांना वाढीव पाणीपूरवठा योजनांसाठी 200 कोटी रु. निधीची तरतूद
- मराठवाडयातील दुष्काळावर कायस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक ग्रीड पध्दत वापरणार, त्यासाठी पुर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी 15 कोटी रु. निधीची अतिरीक्त तरतूद
- नगर परिषदा, नगर पंचायती व ड वर्ग महानगरपालिकात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यासाठी 1100 कोटी रु. निधीची तरतूद
विमानतळ
- शिर्डी विमानतळाचा विकास लवकरात लवकर करण्याचा मानस
- शिर्डी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत.. शिर्डी विमानतळ लवकरच करणार.. अमरावती, शिर्डी अशा विमानतळासाठी 50 कोटी
- बंदर क्षेत्राच्या विकासासाठी 70 कोटींची तरतूद
- नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणार
- नवी मुंबई विमानतळ लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : अर्थमंत्री
- www.abpmajha.in
ऊर्जा
- नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 17-18 या वर्षी 100 कोटींची तरतूद
- विदर्भ, मराठवाड्यात उद्योग येण्यासाठी वीज दरात सवलत, एक हजार कोटींची तरतूद
- राज्यात वीज-पाणी वाचवण्यासाठी ग्रीन इमारती बांधण्यावर भर
- पायाभूत सुविधांच्या विकासासाठी
#महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणार - केंद्र शासनाकडून अपांरपारिक उर्जेकरीता प्राप्त झालेल्या प्रोत्साहनात्मक अनुदानाच्या रकमेपोटी 361 कोटी रु. निधीची तरतूद
- महानिर्मिती कंपनीकडून राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये 750 मेगावॅटचा सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करणार, त्याकरीता 525 कोटी रु. निधीची तरतूद
- विदर्भ मराठवाडा विभागात औद्योगिक घटकांना प्रोत्साहनासाठी वीज दरात सवलतीसाठी 1000 कोटी रु. निधीची तरतूद
- www.abpmajha.in
पायाभूत सुविधा - रस्ते
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1630 कोटी, तर 50 कोटी प्रलंबित रेल्वे मार्गांसाठी
- रस्ते सुधारण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद
- दहा हजार किलोमीटरचे रस्ते येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य : अर्थमंत्री
- राज्याची प्रगती अशीच कायम राहिली तर विरोधक एक-दोन मतदारसंघात निवडून येतील
- हायब्रीड ॲन्युईटी मध्ये अर्थसंकल्पित 195 कामांसाठी 3 हजार 500 कोटी रु. निधीची तरतूद
- केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत 2 हजार 211 कि.मी. रस्त्यांची लांबी सुधारण्यात येत असून 252 मोठया पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार
- www.abpmajha.in
- गेल्या 54 वर्षाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 4 हजार 571 कि.मी. होती ती गेल्या दोन वर्षात 10 हजार 833 कि.मी. वाढल्याचा गौरवपूर्ण उल्लेख
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1 हजार 630 कोटी रु. निधीची तरतूद, 4 हजार 700 कि.मी. लांबीचे रस्त्यांची कामे प्रगतीपथावर
- प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापन करण्यासाठी 50 कोटी रु. निधी उपलब्ध करणार
- रेल्वे मंत्रालय व राज्य शासन यांच्या संयुक्त भागीदारीतून अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा देसाईगंज –गडचिरोली या रेल्वे प्रकल्पांसाठी 150 कोटी रु. निधीची तरतूद
www.abpmajha.in
शिक्षण
- मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या शतकपूर्तीनिमित्त मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था असे नामकरण करून विभागाची पुनर्रचना करणार, यासाठी पुढील 5 वर्षात 25 कोटी रु. निधी उपलब्ध करणार
- राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान रुसा या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 40 कोटी रु. निधीची तरतूद
- औरंगाबाद येथे स्थापन होणा-या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी 39 कोटी 28 लक्ष रु. निधीची तरतूद
- चंद्रपूर येथे सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी 200 कोटी रु. निधीची तरतूद
- नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामाच्या धर्तीवर मुंबईच्या गोरेगावमध्ये महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा उभारणार
- मराठी भाषा संवर्धनासाठी १७ कोटींची तरतूद
तरुणांसाठी
- 1 लाख 22 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्याची योजना
- असंघटीत कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करणार
- शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी
- सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिक शाळा सुरु करणार
- प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास योजना सुरु करणार
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र उभारणार
- म. गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी मजूरीचा दर 192 रु. वरुन 201 रु. इतका करणार
- तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता योजना
- गवंडी कामगारांना प्रशिक्षित करणार, 10 हजार गवंडी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार
- www.abpmajha.in
- 35 उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणार - अर्थमंत्री
- केंद्र पुरस्कृत ग्रामीण कौशल्य योजनेसाठी 59 कोटी 66 लक्ष रु. निधीची तरतूद, 21 हजार 597 लाभार्थ्याना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन
- परसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यासाठी 302 तालुक्यांमध्ये खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणार
- www.abpmajha.in
- दुर्गम भागातील पशू आरोग्य सेवेसाठी 349 फिरते पशूवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
- मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी 75 टक्के अनुदानावर मेंढीगटाचे वाटप करण्याचा निर्णय
- कांदळवन सहव्यवस्थापन समितीद्वारा रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय, यासाठी 15 कोटी रु. निधीची तरतूद
- तामिळनाडूच्या धर्तीवर सिंधुदूर्ग जिल्हयात खेकडा उपज केंद्र सुरु करणार, यासाठी 9 कोटी 31 लक्ष रु. निधीची तरतूद
- बांबू क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य बांबू प्रवर्तन यंत्रणा स्थापित करण्याचा निर्णय, यासाठी 15 कोटी रु. निधीची तरतूद
- असंघटीत कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करणार
- रोजगार निर्मिती व कौशल्य विकासाच्या योजनांच्या देखरेख व नियंत्रणासाठी नियोजन विभागामार्फत नियंत्रक कक्ष स्थापन करणार
- www.abpmajha.in
शेतीसाठी
- कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) येथे कृषी महाविद्यालये सुरु करणार
- मराठवाड्यातील 4000 गावात, विदर्भातील 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प
- नियमित कर्ज भरत आहेत, त्या शेतकऱ्यांना नम्र विनंती, कर्ज थकवू नका : अर्थमंत्री
- शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना आणणार
- थकीत कर्ज संपवावे लागेल, सातबारा कोरा करावा ही आमची भूमिका
- कृषी क्षेत्रातील उत्पन्न 2021 पर्यंत दुप्पट करणार
- भाजीपाल्याला कोल्ड व्हॅन देण्यासाठी विशेष योजना
- www.abpmajha.in
- शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळावं, यासाठी तरतूद
- वीज जोडणीसाठी 981 कोटी रुपयांची तरतूद - अर्थमंत्री
- मागेल त्याला शेततळं योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही
- मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करणार
- जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं ध्येय
- जलयुक्त शिवारासाठी आतापर्यंत 1600 कोटी दिले, पुढील वर्षासाठी 1200 कोटींची तरतूद
- अवर्षणग्रस्त भागासाठी पाणी पुरवठा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करणार
- जलसंपदा विभागात 8 हजार 233 कोटींची तरतूद
- कोकणात काजू लागवड आणि त्यावर प्रक्रियेचा कार्यक्रम
- सूक्ष्म सिंचनासाठी 100 कोटींची तरतूद
- अॅग्रो मार्केटसाठी 50 कोटींची तरतूद
- पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटींची तरतूद
- कृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची तरतूद
- कृषी उत्पन्न 2021 पर्यंत दुप्पट करणार, शेतकरी गट स्थापन करणार , 20 शेतकरीचा एक गट, 200 कोटी रुपये तरतूद , प्रकल्प यशस्वी झाल्यास पैसे कमी पडू देणार नाही
- मराठवाड्यास पाणी प्रकल्प 250 कोटी
- जलसंपदा विभागास 2017-18 मध्ये 8233 कोटी भरीव तरतूद
- www.abpmajha.in
- जलयुक्त शिवार 1600 कोटी आतापर्यंत दिला, 2017- 18- 1200 कोटी प्रस्तावित
- ज्यांना हा अर्थसंकल्प ऐकायचा नाही , त्यांना अर्थसंकल्प यापुढे ऐकायला सदनात पाठवू नको
- 5.4 महाराष्ट्राचा विकास दर हा यांचं (विरोधकांचं) कर्तृत्व, विकासदर पुढल्या वर्षी दोन अंकी करण्याचा आपला विचार आहे
- शेतकरी बांधवांनो हे सरकार तुमच्या पाठिशी
- शेतकऱ्यांच्या भरीव योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद
- शेतकरी जगाचा पोशिंदा, त्यामुळे कृषी क्षेत्रातील समस्या सोडवणं सरकारची जबाबदारी
- महाराष्ट्राचा विकासदर पुढल्या वर्षी दोन अंकी करण्याचा आपला विचार आहे
- शेतकरी बांधवांनो, सरकार तुमच्या पाठीशी आहे
- अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांचा प्रचंड गदारोळ
VIDEO
https://www.facebook.com/abpmajha/videos/10158485299760271/
- www.abpmajha.in
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर बजेट घेऊन विधानभवनात दाखल. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बजेट मांडणार.
मुख्यमंत्र्याचं परिषदेतील निवेदन:
- विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, हे जे थकीत शेतकरी आहेत ते 2012- 13 चे आहेत, आधीचे आहेत.
- दोन वर्षे शेतीमध्ये गुंतवणूक केली म्हणून शेती दर अभूतपूर्व वाढला आहे, 30 टक्के शेतकरी असे आहेत ते आणखी कर्ज घेऊ शकत नाहीत. जे 70 टक्के शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचाही विचार करावा लागेल त्यांच्यावर अन्याय होऊन चालणार नाही. . यातून मार्ग काढला पाहिजे. म्हणून केंद्राकडे गेलो, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली. ते याबाबत सकारात्मक आहेत. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे.
- आत्महत्या थांबवणार का यांवर अवकाळी पाऊस येणार नाही याचीही गॅरेंटी घेणार का. . मी जे बोललो तेच विरोधी पक्ष नेते म्हणाले. विविध कारणे आहेत ज्यामुळे शेतीचे नुकसान होते. म्हणूनच शाश्वत शेती करावी लागेल. गुंतवणूक वाढवावी लागेल. आम्ही विविध उपाययोजना करत आहोत.
- आत्महत्या वर एका दिवसात उपाय नाही. उत्पादकता वाढवावी लागेल. राज्य सरकार पूर्णपणे शेतक-यांच्या मागे उभा आहे. विरोधकांनी अर्थ संकल्प ऐकून घेतला पाहिजे , सरकार काय उपाययोजना करत आहे ते. राजकारण न करता शेतकरी यांच्या हिताकरता कामकाज करावे अशी विंनंती करतो.
CM निवेदन करत असतांना विरोधकांची घोषणा बाजी कायम, निवेदन संपले, परिषद कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब
मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतील निवेदन
- अर्थमंत्री जे बजेट तयार करतील ते शेतकऱ्यांसाठी असेल, घोषणा देऊन तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी बनू शकत नाही - मुख्यमंत्री
- जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांचाही विचार करावा लागेल
- 70% शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांच्या मनात कर्जमाफी होते तर आम्ही का भरु असं येऊ नये, त्यामुळे बँकिंग व्यवस्था कोलमडेल - मुख्यमंत्री
- शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला केंद्र सरकार सकारात्मक
- केंद्राशी सकारात्मक चर्चा झाली, मदत करण्याची विनंती केली
- केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या पाठिशी, काल अर्थमंत्री जेटलींशी सकारात्मक चर्चा- मुख्यमंत्री
- 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे - मुख्यमंत्री
- आम्ही कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, आपल्याला गुंतवणूक करावी लागेल- मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री दिल्ली भेटीबाबत निवेदन करण्याची शक्यता, त्यामुळे बजेट सादर करताना शिवसेनेचे आमदार विरोध करण्याची शक्यता नाही
- विधानभवनातील शिवसेना मंत्री आणि आमदारांची बैठक संपली, सर्व शिवसेना आमदार आणि मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विरोधकांची घोषणाबाजी
विरोधकांनी पुन्हा एकदा विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मंत्री आणि आमदार विधानभवनात प्रवेश करत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. आले रे आले.. हात हलवत आले.. दिल्ली वरून आले.. हात हालवत आले.. नागपुरचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो.. अशा घोषणा देत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
तर शिवसेनेच्या मंत्र्यांना बघून.. काढले काढले... येड्यात काढले, अशा घोषणा विरोधी आमदारांनी दिल्या.
अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र या अर्थसंकल्पावर कर्जमाफीचं सावट असल्यानं आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर कॅबिनेटच्या मंत्र्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. आज मुख्यमंत्री सभागृहात याबाबत निवेदन करतील.
दरम्यान, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत, असं शिवसेना नेते जरी सांगत असले तरी शिवसेनेचं मन वळवण्यात भाजपला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.