एक्स्प्लोर

Vande Bharat Express : मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार - देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Vande Bharat Express : नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा 487 कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे.

Vande Bharat Express :  मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एक्स्प्रेसमुळे अतिशय कमी वेळात मुंबईतून सोलापूरला जाता येईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. 

आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्यासाठी आज रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधीकरण यांच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. या ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’मुळे आशियातील सर्वांत मोठ्या अशा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या बैठकीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे सांगितले.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी 487 कोटी

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा 487 कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. या कार्यादेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी आज दिली. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेक चांगल्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी मिळणार आहेत. याभागातील सामाजिक-आर्थिक विकासाला सुद्धा यामुळे चालना मिळेल. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. हा कार्यादेश जारी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मी नितांत आभारी आहे. प्रत्येक नागपूरकराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.

एअर इंडियाची इमारत राज्याला

नवी दिल्ली येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली आणि मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती केली. सध्या मंत्रालय आणि अ‍ॅनेक्स इमारत मिळून सुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते, त्यामुळे या इमारतीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला. सध्या रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केली आहे. आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं

Embed widget