एक्स्प्लोर

स्थायी समितीच्या अध्यक्षांची प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis : हे सरकार सावकारी पद्धत चालणारे सरकार असून ते सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीज रक्कम वसुली करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

कल्याण: राज्य सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून या सरकार मधील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे लोक हे केवळ स्वतःचे कैवारी झाले आहेत,  यांना केवळ स्वतःचे धंदे करायचे असल्याची जोरदार टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्थायी समितीच्या अध्यक्षांची प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या असंही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भव्य शेतकरी मेळाव्याते ते बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, "भात उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा असेल तर अडीचशे-तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागत नाहीत. मात्र मुंबई महानगरपालिकेतील एका स्थायी समिती अध्यक्षाने दोन वर्षात जी प्रॉपर्टी कमावली आहे, त्या प्रॉपर्टीची किंमतच 200 ते 300 कोटी पेक्षा जास्त आहे. कोविडच्या एका वर्षाच्या काळात स्थायी समितीच्या अध्यक्षांनी कमावलेल्या 38 प्रॉपर्टी विकल्या तरी देखील भात उत्पादक शेतकऱ्याला बोनस देता येईल."

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या सरकारने चार हजार कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांना दिला. मात्र या सरकारने शेतकऱ्यांकडून फक्त विम्याचे पैसे घेतले. परंतु टेंडर काढताना अशा कंडिशन टाकल्या की केवळ विमा कंपन्यांना त्याचा फायदा होईल. आमच्या काळात विमा शेतकऱ्यांना मिळत होते तरी या लोकांनी विमा कंपन्यांवर मोर्चे काढायला लावले."

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना चार पटीने विम्याचे पैसे मिळत होते. आताच्या सरकारने हे पैसे दोन पटीवर आणून ठेवले आहेत. शेतकऱ्यांना दोन पटीवर आणण्याचं पाप या सरकारने केलं आहे. एमआयडीसीट्आ  नावाखाली खाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या जात असून त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली राहीला नाही."

हे सरकार सावकारी पद्धत चालणारे सरकार असून ते  सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीज रक्कम वसुली करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Embed widget