एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर, मनसे-भाजप युतीच्या चर्चेला उधाण

Devendra Fadnavis meets Raj Thackeray : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली.

Devendra Fadnavis meets Raj Thackeray : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली आहे. या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही.  सुत्रांच्या  माहितीनुसार, या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली असावी.

दिवाळीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नाशिकमध्ये भेट झाली होती. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिल्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलेय. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर दिवाळीमध्ये राज ठाकरे आपल्या नव्या घरी शिफ्ट झाले. राज ठाकरे यांनी कृष्णकुंजच्या शेजारीच नवे घर बांधले आहे.  या नव्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे. या भेटीत राज्यातील परिस्थिती आणि युतीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.  

2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळालं.  भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaAjit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवारLoksabha Election 2024 : राज्यातील चौथ्या टप्प्यातले 11 मतदारसंघ कोणते ? कसं असेल वेळापत्रक ?Ajit Pawar - Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार; विजयासाठी देवापुढे साकडं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Suresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय',  शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय', शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं
दिल्लीची गुजरात मोहीम फत्ते, रिषभ पंतची टीम विजयाच्या ट्रॅकवर, मॅच संपताचं सगळं सांगून टाकलं..
Embed widget