Devendra Fadnavis Stamp Scam Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, अशी मागणी अॅड. रवी जाधव यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलाय. मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात चौकशीच्या मागणीसाठी अर्ज केलाय. विशेष पीमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी जाधव यांचा हा अर्ज स्वीकारला आहे.
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. साल 2008 दरम्यान चर्चेत आलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणात फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात वकील रवी जाधव यांनी तसा रितसर अर्ज दाखल केला आहे. रवी जाधव हे जमीन मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या वकील सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रवीण उके यांचे वकील आहेत. याच प्रकरणातील सुनावणी दरम्यान जाधव यांनी मंगळवारी हा अर्ज कोर्टात सादर केला.
रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात केलेला अर्ज स्वीकरत न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी ईडीच्या संबंधित अधिका-यांना यांनी पुढील कारवाईचा दिला आहे. सतीश उके यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष सत्र न्यायाधीश एमजी देशपांडे यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.
नागपूरचे वकील सतीश उके यांना जमीनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं अटक केली आहे. सतीश उके यांनी कोट्यावधी रुपयांचा बनावट स्टॅम्प घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी यापूर्वी नागपुर न्यायालयातही रितसर अर्ज केला होता. मात्र न्यायालयानं या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यापूर्वीच सतीश उके यांना जमीनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं अटक केली होती. मात्र सतीश उके यांच्यावतीनं मगंळवारी पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हा अर्ज सादर करण्यात आला. ज्यातून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीनुसार विशेष पीएमएलए कोर्टानं ईडीचे संबंधित अधिकारी परमेश्वर रविशंकर यांना या तक्रार अर्जावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
आणखी वाचा :
एअर इंडिया आणि विस्ताराचा विलीनीकरणचा मार्ग मोकळा, सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटी गुंतवणूक करणार