एक्स्प्लोर

खडसे, महाजनांवरील आरोप खोटे : मुख्यमंत्री

पुणे: सरकारचं काम प्रामाणिकपणे सुरु आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरील सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. जनतेला कन्व्हिन्स करु शकत नाहीत, म्हणून कन्फ्युज करण्याचा विरोधकांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडून, काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात रस्त्यावर उतरून,  गावोगावचे भ्रष्टाचार बाहेर काढा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.   येत्या वर्षभरात मुंबई पुण्यासह पाच महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात सुरु आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी खडसेंची पाठराखण केली.   शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,  अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.   खडसेंचा स्वत:हून राजीनामा   मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.   "खडसेंवरील सर्व आरोप तथ्यहीन आहेत. लाचखोरी प्रकरणातील गजानन पाटीलशी खडसेंचा संबंध नाही हे एसीबीने सांगूनही त्यांच्यावर आरोप झाले.  दाऊदचे फोन आल्याचा विषय झाल्यावर ATS कडे चौकशी दिली आणि त्यांनी निर्वाळा दिला की असा कुठला फोनच आला नाही. तर MIDC संदर्भात नाथाभाऊंनी राजीनामा दिला. चौकशी सुरु आहे. त्यामुळे मी बोलणार नाही. या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ बाहेर येणार याची खात्री आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे नाथाभाऊंनी स्वत: राजीनामा देऊन, चौकशीची मागणी केली आहे." असं मुख्यमंत्री म्हणाले.   गिरीष महाजनांवरही खोटे आरोप   जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप आहे. मात्र या आरोपानंतर आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर हे आरोप पूर्णत: चुकीचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.   संबंधित जमीन कोणाच्या नावे आहे, याबाबतची कागदपत्रं इंग्रजांच्या काळापासून तपासली. १८८५ च्या रजिस्टर मध्ये  ही जमीन महार वतनाची नसल्याचं सिद्ध झालं. ही जमीन महार वतनाची नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.   काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने आरोप करते   काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारचे भूखंड परत करावे, मग त्यांनी आमच्यावर आरोप करावे. हे लोक आम्हाला शिष्टाचार शिकवू शकत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने आरोप करते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.   ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचार करु, त्या दिवशी पद सोडून घरी जाऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.   ५ वर्षांनी आम्हाला निवडून दिल्याचा जनतेला अभिमान वाटेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.   खडसेंचीही हजेरी   बालंधर्व रंगमंदिरातील बैठकीला राज्यभरातील भाजपचे नेते दाखल झालेत. विशेष म्हणजे केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या एकनाथ खडसेंनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मात्र हजेरी लावली. बैठकीमध्ये खडसे व्यासपीठावर होते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांचीही उपस्थिती आहे.   दरम्यान या कार्यक्रमानिमित्त करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे पुण्याचं विद्रुपीकरण झालं आहे. दोन दिवस चालणाऱ्या कार्यकारिणीचा उद्या समारोप होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील.

महत्त्वाच्या बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget