एक्स्प्लोर

मुख्यमंत्री आणि गडकरींच्या हेलिपॅडसाठी विकासकामांवर हातोडा

मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील ८ मोठे पूल, एक मोठा रस्ता आणि १२ सिमेंट नाल्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.

बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरामध्ये घडला आहे. मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील ८ मोठे पूल, एक मोठा रस्ता आणि १२ सिमेंट नाल्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी दुसरी योग्य जागा मिळत नसल्यानं याठिकाणी हेलीपॅड बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणण आहे. नेमका प्रकार काय? मलकापूरचे भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या वाढदिवसासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे. नांदुऱ्यात होणाऱ्या आमदारांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. त्यासाठी हेलिपॅड बांधलं जात आहे. पण ते बांधत असताना प्रशासनाने सुमारे दीड कोटींच्या विकास कामांवरच बुलडोझर चालवला. जिगावच्या प्रकल्पात आपलं घर दार बुडालेले लोक इतरांच्या  भल्यासाठी पुनर्वसित झाले. नव्याने संसार उभा केला पण त्यालाही राजकारण्यांच्या वाढदिवसाची नजर लागली. आता मुख्यमंत्री जेव्हा हेलिकॉप्टरमधून या हेलिपॅडवर उतरतील, तेव्हा त्यांच्या पायदळी पुनर्वसित गावकऱ्यांचा त्याग असेल. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण एबीपी माझानं उघडकीस आणल्यानंतर विरोधकांनी देखील यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यासाठी अशाप्रकारे विकासकामं उद्धवस्त करणं चुकीचं असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकाराबाबत मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget