बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीमधील गोविंद बागेत आज (14 नोव्हेंबर) दिवाळी पाडवा उत्साहात पार पडला. दिवाळीच्या कार्यक्रमात पवार कुटुंबीय नेहमीच एकत्र येते. मात्र, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. त्यामुळे या दिवाळीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी फोडून भाजपला मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवारांच्या सहभागाविषयी चर्चा रंगली होती. 






आज दिवसभर कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियात फोटो पोस्ट केले होते. मात्र, त्यामध्ये अजित पवार दिसून आले नव्हते. मात्र, त्यांनी संध्याकाळी अकराच्या सुमारास इन्स्टावर केलेल्या पोस्टमध्ये अजित पवार थेट शरद पवारांच्या मागे दिसून आले. त्यामुळे दिवसभर सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत अजित पवार पवारांच्या दिवाळीत सामील झाल्याचे स्पष्ट झाले. 



दरम्यान, आजच्या पवारांच्या दिवाळी कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जेवणासाठी पूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. वार कुटुंबियांच्या एकत्र फोटोमध्ये सुनेत्रा पवार दिसल्या होता. मात्र, अजित पवार मात्र त्या फोटोंमध्ये कुठेच दिसले नसल्याने भूवया उंचावल्या होत्या.


शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट


दुसरीकडे, डेंग्यूपासून दिलासा मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शहा आणि अजित यांच्या भेटीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते. अजित पवार शरद पवार यांना एकटे भेटले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेट दिवाळीच्या सेलिब्रेशनबाबत होती. मात्र, अजितच्या एक दिवस आधी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. यावर सुप्रिया यांनी कोणतेही उत्तर दिलेलं नव्हतं. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय आहे. याचबाबत राजकीय वर्तुळात अजित पवार गट सध्या नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या