एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फ्लोरटेस्टआधी महाविकासआघाडीचं शक्तिप्रदर्शन, ग्रँड हयातमध्य़े 162 आमदारांची ओळखपरेड
परडेच्या नावाखाली महाविकास आघाडीचं हे शक्तीप्रदर्शन असल्याचं बोललं जातंय. तीनही पक्षांचे आमदार हयात हॉटेलच्या दिशेनं रवाना झाले.सोफिटेल हॉटेलमधून राष्ट्रवादीचे आमदार जे डब्ल्यू मॅरिएटमधून काँग्रेसचे आमदार आणि लेमन ट्री हॉटेलमधून शिवसेनेचे आमदार हयात हॉटेलसाठी निघाले आहेत. याद्वारे भाजप आणि जनतेला आपलं संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तापेचाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत आहे. बहुमत चाचणी संदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालय उद्या (26 नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनण्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यादरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोमवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी 7 वाजता शक्ती प्रदर्शन करणार आहे. तिन्ही प्रमुख पक्ष आणि अपक्ष 162 आमदार मुंबईतील ग्रँड हयातमध्ये ओळखपरेड होणार आहे.
परडेच्या नावाखाली महाविकास आघाडीचं हे शक्तीप्रदर्शन असल्याचं बोललं जातंय. तीनही पक्षांचे आमदार हयात हॉटेलच्या दिशेनं रवाना झाले.सोफिटेल हॉटेलमधून राष्ट्रवादीचे आमदार जे डब्ल्यू मॅरिएटमधून काँग्रेसचे आमदार आणि लेमन ट्री हॉटेलमधून शिवसेनेचे आमदार हयात हॉटेलसाठी निघाले आहेत. याद्वारे भाजप आणि जनतेला आपलं संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय आणि आमच्याकडे 16 संख्याबळ असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार ग्रँड हयातमध्ये ठीक सात वाजता एकत्र आपण पाहू शकाल, असंही राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे सात वाजता प्रथमच हे तिन्ही आमदार एकत्र पाहायला मिळणार आहे.
We are all one and together , watch our 162 together for the first time at grand Hyatt at 7 pm , come and watch yourself @maha_governor pic.twitter.com/hUSS4KoS7B
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 25, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement