एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर 26 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलन, मराठा समाजाचा इशारा
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे काल मराठा समाजाची बैठक पार पडली झाली. या बैठकीत नवीन कोअर कमिटी जाहीर करण्यात आली.
नवी मुंबई : येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा सामाजाच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 26 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे काल मराठा समाजाची बैठक पार पडली झाली.
या बैठकीत नवीन कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. ही समिती राज्यभरातील समनव्यक समित्यांना पुढील दिशा स्पष्ट करणार आहे. मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मुंबई गोवा या सगळ्या परिसरातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.राज्यस्तरीय बैठकीत राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
मराठा ठोक आंदोलनातील आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेणे,शेतकऱ्यांचे कर्ज माफी,कोपर्डी खटला जलदगती न्यायालयात चालवणे या प्रमुख मागण्या यावेळी राज्यस्तरीय बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement