Jahangirpuri Violence Update : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंती दिनी (Hanuman Jayanti 2022) झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. 16 एप्रिल रोजी झालेल्या या घटनेच्या संदर्भात जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आठ पोलिस आणि एका नागरिकासह एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लागली गोळी, आणखी पोलीस जखमी 


दिल्ली पोलिसांचे एसआय मेघलाल यांना गोळी लागली आहे, ते जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. एबीपी न्यूजशी बोलताना मेघलाल म्हणाले की जमावाने हल्ला केला, आम्ही जमावाचा पाठलाग करत होतो, तेव्हा तिथून कोणीतरी गोळीबार केला. दगडफेकीत आणखी काही पोलीस जखमी झाले. वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


काल दिल्लीत काय घडलं?


दिल्लीतील जहांगीरपुरी येथे काल संध्याकाळी हनुमान जयंती दिनी मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली. उत्तर पश्चिम दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दोन समुदायांचे लोक आमनेसामने आले. दगडफेक आणि शस्त्रास्त्रांचा मारा करून मोठा गोंधळ झाला. हा सर्व प्रकार काल सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान घडला. जहांगीरपुरीच्या कुशल सिनेमाजवळून ही मिरवणूक जात होती, त्याचवेळी मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली. दुरूनच रस्त्यांवर दगडफेक होत होती. यावळी हल्लेखोरांनी अनेक वाहनांचेही नुकसान केले असून अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. त्याचवेळी अनेक वाहने जाळण्यात आली. वाहन जाळले तेव्हा लोक इकडे तिकडे रस्त्यावर धावताना दिसले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप


Petrol Diesel Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या


Jahangirpuri Violence : दिल्लीच्या जहांगीरपुरीतील गोंधळानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट, पोलीस प्रशासनाला 'या' सूचना


MoD Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 'या' पदांवर भरती, 50 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना करता येणार अर्ज