सोलापूर : मंगळवारी दिल्लीतील अर्पित हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या भयानक आगीत सोलापूरच्या राहुल शाखापुरे (40) आणि संतोष वाले (41) या दोघांना आपला जीव गमवावा लागला.


राहुल शाखापुरे हे केंद्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. अंत्यत खडतर परिस्थितीत शिक्षण घेत राहुल केंद्र शासनाच्या सेवेत रुजू झाले होते.

राहुल यांना चार वर्षाची एक मुलगी आहे. आपले वडील कधी घरी परतणार अशी विचारणार तेजश्री करत आहे. घरचा कमावता मुलगा गेल्यानं कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

राहुल यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील विविध पदांवर कार्य केलं आहे. पदोन्नतीनंतर ते सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते.

राहुल शेखापुरे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीत गेले होते. अर्पित हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले असता आगीने त्यांना भक्ष्य केलं. एक चांगला अधिकारी,  चांगला मुलगा, शांत आणि सयंमी व्यक्तिमत्व हरवल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिल्लीतील हॉटेलमधल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये बाळाचाही समावेश


दिल्लीतील करोल बागमधील चार मजली हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये पहाटे लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, ज्यात बाळ आणि महिलांचाही समावेश होता. या दुर्घटनेतील बऱ्याच लोकांचा मृत्यू श्वास गुदमरुन झाला आहे. एसी रुमच्या खिडक्या (काचेच्या खिडक्या) बंद होत्या, ज्यामुळे धूर बिल्डिंगबाहेर जाऊ शकला नाही. गाढ झोपेत असलेल्या हॉटेलचे पाहुणे आगीच्या कचाट्यात सापडले. यावेळी चार ते पाच जणांनी इमारतीवरुन उडी मारली. दोघांनी उशीच्या आधारे उडी मारली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

 हॉटेलमध्ये फायर सेफ्टीची योग्य व्यवस्था नव्हती. गेस्ट हाऊस आणि हॉटेलमध्ये आपत्कालीन रस्ता नव्हता. एसीमुळे सगळ्या खिडक्या बंद होत्या. अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या मदतीने रुमच्या खिडक्या तोडून आत पोहोचले होते. तिथूनच लोकांना बाहेर काढलं.  दरम्यान, हॉटेल मालकाला चौकशीसाठी बोलावलं असून त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.