एक्स्प्लोर

बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील, फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

Deglur bypoll Election : महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे फक्त भ्रष्ट्राचार करत आहे. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं.

Deglur Bypoll Election : महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे फक्त भ्रष्ट्राचार करत आहे. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केली. ते नांदेडमधील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.  

मागील दीड वर्षांत राज्याने अनेक नैसर्गिक संकटं पाहिली. वादळं, महापूर, अतिवृष्टी यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. याची झळ राज्यातील शेतकऱ्यांना बसली. पण या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसेही व्यवस्थित दिले गेले नाही. हे सरकार लबाड आहे. काहीही झालं की केंद्राला जबाबदर धरतं, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतली. देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोट-निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ कुंडलवाडी, बिलोली आणि देगलूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले ही उपस्थित राहाणार होते. आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा आणि नुकसान भरपाई हा भाजपचा प्रमुख मुद्दा असल्याचं पोटनिवडणुकीतील प्रचारावरुन दिसतेय. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली.

राज्यातील सरकारला अद्याप पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. संपूर्ण राज्यासाठी फक्त 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. आपलं सरकार होतं तेव्हा मराठवाड्याच्या एका जिल्ह्याला 500 कोटी रुपयांची मदत केली होती. राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे. हे लबाड सरकार आहे. भागवत कराड यांनी विमा कंपन्याची बैठक घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. विमा कंपन्यानी त्यांना सांगितलं की, राज्य सरकारनं त्यांच्या वाट्याचे सतराशे कोटी रुपये भरले नाहीत. तर आम्ही कसे पैसे देऊ. राज्य सरकारने आपल्या वाट्याचे पैसे भरले असते तर आम्ही 4 हजार कोटी रुपये दिले असते. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 04 Oct 2024ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Embed widget