मुंबई : मध्य रेल्वेने चार  विशेष गाड्या सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. रेल्वे अधिक विशेष गाड्या चालविणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड या विशेष गाडीच्या थांब्यात बदल करणार असल्याचे सांगितले आहे.


महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर मंत्रालयाने आता महाराष्ट्रातील मुख्य शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्सप्रेस हळूहळू सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर जास्त मागणी आहे अशा मार्गांवर प्रथम एक्सप्रेस गाड्या सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या वेळेस मुंबई पासून पुणे, नागपूर, सोलापूर आणि गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या.


1. लोकमान्य टिळक टर्मिनस- कामाख्या वातानुकूलित साप्ताहिक विशेष


02520 वातानुकूलित विशेष ट्रेन 15 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत कामाख्या येथून दर गुरुवारी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी पोहोचेल.


02519 वातानुकूलित विशेष ट्रेन 18 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी सुटेल व कामाख्या येथे तिसर्‍या दिवशी पोहोचेल.


थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपुर, बेगुसराई, खगरिया, नौगाचीया, कठिहार, किशनगंज, न्यु जलपाईगुडी, न्यु कुचबेहार, न्यु बोन्गाईगाव, रांगीया


वेळ व संरचना : नियमित गाडी क्रमांक 12520/12519 प्रमाणे.


2. पुणे- हावडा दुरंतो द्वि-साप्ताहिक विशेष


02222 दुरांतो विशेष ट्रेन 15 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हावडा येथून प्रत्येक गुरुवार आणि शनिवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.


02221 दुरांतो विशेष ट्रेन 17 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवार व शनिवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हावडा येथे पोहोचेल.


थांबे, वेळ व संरचना : दौंड वगळता नियमित गाडी क्रमांक 12221/12222 प्रमाणे.


3. पुणे- हजरत निजामुद्दीन वातानुकूलित साप्ताहिक विशेष


02494 वातानुकूलित विशेष ट्रेन 16 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्यात दाखल होईल.


02493 वातानुकूलित विशेष ट्रेन 18 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.


थांबे, वेळ व संरचना : नियमित गाडी क्रमांक 12494/12493 दर्शन वातानुकूलित एक्सप्रेस प्रमाणे.


4. पुणे- हजरत निजामुद्दीन दुरांतो द्वि-साप्ताहिक विशेष


02264 दुरांतो विशेष ट्रेन 15 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर सोमवार आणि गुरुवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्यात पोहोचेल.


02263 दुरांतो विशेष ट्रेन 16 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.


थांबे, वेळ व संरचना: लोणावळा वगळता नियमित गाडी क्रमांक 12263/ 12264 दुरांतो एक्सप्रेस प्रमाणे.


मुंबई-हजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या थांब्यांमध्ये बदल


रेल्वेने 01141/01142 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हजूर साहिब नांदेड विशेष या ट्रेनच्या थांब्यांमध्ये बदल केले आहेत. 01141/01142 विशेष अप आणि डाउन दोन्ही दिशेने नगरसोल येथे थांबणार नाही आणि 01142 विशेष केवळ अप दिशेने मानवत रोड स्थानकात थांबेल.


आरक्षण : 02519 व 02493 वातानुकूलित विशेष आणि 02221 व 02263 दुरांतो विशेष गाड्यांचे बुकिंग 13 ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.


 पुणे- हावडा आणि पुणे- हजरत निजामुद्दीन विशेष दुरांतो या गाड्यासाठींचे शुल्क कॅटरिंगचे शुल्क वगळून आकारले जाणार आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


संबंधित बातम्या :