नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने तिकीटांच्या आरक्षणासंबंधी मोठे बदल केले आहेत. या बदलेल्या नियमानुसार आता गाडी सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी तिकीट आरक्षणाची दुसरी यादी लावण्यात येणार आहे. हा बदल आजरपासुन लागू होणार आहे. या आधीच्या नियमानुसार हा काळ दोन तास इतका होता.
यासंबंधी काढण्यात आलेल्या एका निवेदनात रेल्वेने सांगितले आहे की कोविड-19 च्या पूर्वीच्या नियमांनुसार इंटरनेटच्या आणि पीआरएस काउंटरच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य तत्वानुसार रिकाम्या बर्थसाठी ऑनलाईन टिकीट बुकिंग करता यावे यासाठी तिकीट आरक्षणाची पहिली यादी ही गाडी स्थानकावरून सुटण्यापूर्वी किमान चार तास आधी तयार केली जात होती.
रेल्वेने असंही सांगितलं आहे की याआधी तिकीटांच्या आरक्षणाची दुसरी यादी ही गाडी स्थानकावरून सुटण्याआधी अर्धा तास ते पाच मिनीटे आधी तयार करण्यात येत होती. यादरम्यान आधीपासून बुकिंग केलेले तिकिट रद्द करता येऊ शकत होते. त्यावर पैसे परत मिळण्याची व्यवस्था होती. कोरोनाच्या काळात हा काळ अर्ध्या तासांहून वाढवून दोन तासांचा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
रेल्वे प्रवाश्यांना दिलासा देण्यासाठी या विषयावर झोनल रेल्वेकडून आढावा घेण्यात आला. त्यानुसार रेल्वे आरक्षणाची दुसरी यादी ही गाडी स्थानकावरून सुटण्यापूर्वी किमान अर्धा तास तयार करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊन असल्याने सर्व गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने काही गाड्या सुरू करण्यात आल्या. त्याची सुरवात 1 मे रोजी श्रमिक स्पेशल गाड्यांनी झाली. त्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांना त्याच्या मूळ राज्यात पोहचवण्यात आले.
आजपासून रेल्वे तिकीट आरक्षणाची दुसरी यादी लागणार गाडी सुटण्यापूर्वी केवळ अर्धा तास आधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2020 02:02 PM (IST)
रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
या आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा काळ दोन तासांचा केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -