मुंबई : कालच मध्य रेल्वेने मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला असताना आता त्यात वाढ करून आणखीन आठ एक्सप्रेस सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, लातूर आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्सप्रेस मध्य रेल्वे सुरु करणार आहे. येत्या 11 तारखेपासून या एक्सप्रेस धावू लागतील असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर मंत्रालयाने आता महाराष्ट्रातील मुख्य शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्सप्रेस हळूहळू सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर जास्त मागणी आहे अशा मार्गांवर प्रथम एक्सप्रेस गाड्या सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या वेळेस मुंबई पासून पुणे, नागपूर, सोलापूर आणि गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस मुंबईपासून कोल्हापूर, नांदेड आणि लातूर या शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस सोबत पुण्याला महाराष्ट्रातील इतर शहरांना तोंडासाठी एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत.
या 8 एक्सप्रेस कोणत्या आणि त्यांचे वेळापत्रक आणि थांबे कोणते ते जाणून घेऊया :
1. मुंबई-कोल्हापूर विशेष दैनिक
01029 विशेष ट्रेन दिनांक 13.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी कोल्हापूरला पोहोचेल.
01030 विशेष गाडी दिनांक 12.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोल्हापूर येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
थांबे आणि वेळ : कराड, कर्जत, तारगाव, टाकरी, वालिवडे आणि घोरपडी थांबे वगळता नियमित गाडी क्रमांक 11029/ 11030 कोयना एक्स्प्रेस प्रमाणे.
संरचना : 1 तृतीय वातानुकूलित, 2 वातानुकूलित चेअर कार, 2 शयनयान, 10 द्वितीय आसन श्रेणी.
2. मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष आठवड्यातून 4 दिवस.
02207 सुपरफास्ट विशेष गाडी दिनांक 11.10.2010 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी लातूर येथे पोहोचेल.
02208 सुपरफास्ट विशेष दिनांक 12.10.2010 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लातूर येथून दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी पोहोचेल.
थांबे आणि वेळ : लोणावळा, मुरुड आणि हारंगुल थांबे वगळता नियमित गाडी क्रमांक 22107/22108 लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे.
संरचना : 1 प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी.
3. पुणे-नागपूर वातानुकूलित विशेष साप्ताहिक
01417 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दिनांक 15.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी नागपूरला पोहोचेल.
01418 विशेष वातानुकूलित साप्ताहिक दिनांक 16.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत नागपूर येथून प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी पुण्याला पोहोचेल.
थांबे आणि वेळः नियमित गाडी क्रमांक 11417/11418 हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे.
संरचना : 13 तृतीय वातानुकूलित.
4. पुणे-अजनी विशेष वातानुकूलित साप्ताहिक
02239 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दिनांर 17.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी पुण्याहून सुटेल आणि दुसर्या दिवशी अजनीला पोहोचेल.
02240 विशेष वातानुकूलित साप्ताहिक दिनांक 18.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत
अजनी येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी पुण्याला पोहोचेल.
थांबे आणि वेळ : नियमित ट्रेन क्रमांक 22139/22140 वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे.
संरचना : 13 तृतीय वातानुकूलित.
5. पुणे-अमरावती वातानुकूलित विशेष साप्ताहिक
02117 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दिनांक 14.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमरावतीला पोहोचेल.
02118 विशेष वातानुकूलित साप्ताहिक दिनांक 15.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अमरावती येथून दर गुरुवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी पुण्याला पोहोचेल.
थांबे आणि वेळ : नियमित ट्रेन क्रमांक 22117/22118 सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे.
संरचना : 1 प्रथम वातानुकूलित, 4 द्वितीय वातानुकूलित, 9 तृतीय वातानुकूलित.
6. अजनी-पुणे विशेष वातानुकूलित साप्ताहिक
02224 विशेष वातानुकूलित साप्ताहिक दिनांक 13.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अजनी येथून दर मंगळवारी सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
02223 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दिनांक 16.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत पुण्याहून प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी अजनीला पोहोचेल.
थांबे आणि वेळ : नियमित गाडी क्रमांक 22123/22124 वातानुकूलित सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रमाणे.
संरचना : 1 प्रथम वातानुकूलित, 4 द्वितीय वातानुकूलित, 9 तृतीय वातानुकूलित.
7. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - गोंदिया विशेष दैनिक
01039 विशेष दिनांक 11.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून दररोज सुटेल आणि दुसर्या दिवशी गोंदियाला पोहोचेल.
01040 विशेष ट्रेन दिनांक 13.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोंदिया येथून दररोज सुटेल आणि दुसर्या दिवशी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचेल.
थांबे आणि वेळ : सेवाग्राम, चांदूर, जलंब, पुणतांबा, जरंडेश्वर, तारगाव, मसूर, भवानी नगर, टाकरी आणि वालिवडे थांबे वगळता नियमित रेल्वे क्रमांक 11039/11040 महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रमाणे.
संरचना : 1 द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 5 द्वितीय आसन श्रेणी.
8. मुंबई- हजूर साहिब नांदेड विशेष दैनिक
01141 विशेष दिनांक 11.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज प्रस्थान करेल व दुसर्या दिवशी हजुर साहिब नांदेडला पोहोचेल.
01142 विशेष दिनांक 12.10.2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हजुर साहिब नांदेड येथून दररोज रवाना होईल आणि दुसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा.
संरचना : 1 प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 4 द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : 01029/01030 विशेष, 02207/02208 सुपरफास्ट विशेष, 02224/02223 वातानुकूलित विशेष, 01039 आणि 01141 विशेष गाड्यांचे आरक्षण दि. 9.10.2020 पासून सुरू होतील; 01417/ 01418, 02117/02118 आणि 02239/02240 विशेष वातानुकूलित गाड्यांचे आरक्षण दिनांक 11.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु असेल.
मध्यरेल्वे कडून सांगण्यात आले आहे.या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात असेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.