सांगली : जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील सांडगेवाडीचा प्रशांत विजय सकट हा तरुण आपल्या प्रामाणिकपणामुळे चर्चेत आला आहे. रस्त्यावर सापडलेली तब्बल पाच लाख सत्तर हजार रुपये रक्कमेची पिशवी प्रामाणिकपणे आणि एका रुपयाचीही अपेक्षा न करता सबंधित व्यक्तीला प्रशांतने परत केली. प्रशांतची तशी कौटुंबिक परिस्थिती देखील बेताचीच आहे. तो वेल्डर म्हणून काम करतो. पत्र्याच्या शेडमध्ये राहून कष्ट करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह करतोय,अशी कौटुंबिक परिस्थिती असलेल्या प्रशांतच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी प्रशांतचे कौतुक केले.
पलूस ते सांडगेवाडी एमआयडीसी रोड वरून घरी जात असताना प्रशातला वाटेत कापडाची एक बंद तुटलेली पिशवी पडलेली दिसली. पिशवीत काहीतरी आहे, असं त्याला वाटलं म्हणून त्यांनं त्या पिशवीचं तोंड उघडल. त्यात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल त्या पिशवीत होते. एवढी रक्कम त्यांनं उभ्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. प्रशांतने ती पिशवी उचलली. घाबरलेल्या अवस्थेतच तो घरी आला आणि तासभर त्या पैशांचे बंडल मोजत बसला. ती एकूण रक्कम भरली पाच लाख सत्तर हजार रुपये, प्रशांतने काही वेळ विचार केला आणि व्हॉटसअॅपला एक मेसेज पाठवला. "पलूस ते सांडगेवाडी एमआयडीसी रोडवरती कोणाचे पैसे पडले असतील तर कॉल करा. ओळख पटवून पैसे घेऊन जाणे. रक्कम मोठी आहे." प्रशांतने मेसेजमध्ये रक्कम टाकलीच नव्हती. त्यामुळे या लबाड दुनियेतून त्याला 'पैसे माझे आहेत' असे अनेक फेक कॉल आले. पण त्या कॉलवर बोलली जात असलेली रक्कम आणि प्रशांतला सापडलेली रक्कम यात ताळमेळ लागत नव्हता.
पैसे पडलेल्या माणसाच्या अवस्थेचा विचार करून प्रशांत अस्वस्थ होता. घड्याळाचे काटे फिरत होते. वेळ जात होता प्रशांत वाट पाहत होता. सहा वाजले आणि प्रशांतला देवराष्ट्रे वरून एक कॉल आला. त्या व्यक्तीने प्रशांतला सांगितलेली रक्कम, पिशवीचा कलर आणि पिशवीतील चिठ्ठीचे वर्णन तंतोतंत जुळले. तेव्हा प्रशांतने त्या व्यक्तीला घरी बोलावून घेतले. या दुनियेत प्रशांतसारखा माणूस आहे हे पाहून त्या 65 वर्षीय व्यक्तीला भरून आले. त्या व्यक्तीला रडू कोसळले. पैसे परत करताना ती व्यक्ती प्रशांतला दहा हजार रुपये बक्षिस म्हणून देऊ लागली. पण प्रशांतचे मन त्या पाच लाख सत्तर हजारावर गेले नाही तर दहा हजारावर कसे जाईल? प्रशांतने ते पैसे नाकारले व ती रक्कम ज्याची होती त्याला देऊन टाकली. प्रशांतचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रशांतच्या वडिलांना जग जिंकल्याचा आनंद झाला. पलूस पोलीस निरीक्षक यांनी प्रशांतला बोलवून स्वतः त्याचा सत्कार केला.
याबद्दल राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पलूस नगरपरिषद ,पलुस पोलीस ठाणे, शिवसेना कार्यालय, ते काम करत असलेले अरुण ब्रह्मे यांचे ऑफिस सह विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.आजच्या कोरोना महामारी च्या काळामध्ये प्रशांत सकट यांनी केलेली कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सर्वत्र त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . सकट व त्यांचे मिञ अजित भोसले त्यांनी ताबडतोब व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मेसेज पाठवले व संबंधित व्यक्तीपर्यंत ही रक्कम पोस्ट केली बक्षीस म्हणून सदर शेतकरी प्रशांतला 20 हजार रुपये देत होते पण प्रशांतने ते घेतले नाहीत.
दुसऱ्याच कुणाच्या हाती पैसे लागू नये म्हणून प्रशांतने व्हॉट्सअॅपचा घेतला आधार
प्रशांतने रक्कम सापडल्यानंतर काही वेळ विचार केला. ही रक्कम ज्याची आहे त्याच्या पर्यत कशी जाईल यावर विचार केला. त्यासाठी त्याने व्हॉट्सअॅपचा आधार घेतला. प्रशांतने व्हाट्सअॅप ला एक मेसेज सोडला. "पलूस ते सांडगेवाडी एमआयडीसी रोड वरती कोणाचे पैसे पडले असतील तर कॉल करा. ओळख पटवून पैसे घेऊन जाणे. रक्कम मोठी आहे." प्रशांतने मेसेजमध्ये रक्कम टाकलीच नव्हती. त्यामुळे या लबाड दुनियेतून त्याला 'पैसे माझे आहेत' असे अनेक फेक कॉल आले. पण त्या कॉलवर बोलली जात असलेली रक्कम आणि प्रशांतला सापडलेली रक्कम यात ताळमेळ लागत नव्हता. पैसे पडलेल्या माणसाच्या अवस्थेचा विचार करून प्रशांत अस्वस्थ होता. घड्याळाचे काटे फिरत होते. वेळ जात होता प्रशांत वाट पाहत होता. सहा वाजले आणि प्रशांतला देवराष्ट्रेवरून एक कॉल आला. त्या व्यक्तीने प्रशांतला सांगितलेली रक्कम, पिशवीचा कलर आणि पिशवीतील चिठ्ठीचे वर्णन तंतोतंत जुळले आणि ही त्याच व्यक्तीचे पैसे आहेत याची प्रशांतला खात्री पटली.