Sharad Joshi : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असणाऱ्या शरद जोशी (Sharad Joshi) यांचा आज स्मृतीदिन. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शरद जोशी यांनी आपल्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी अंदोलने उभा केली. संपूर्ण हायातभर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यात कोठेही शरद जोशी यांचे भाषण असेल तर तब्बल 1 हजार किलोमीटर अंतरावरून लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येत असत. 'शेतमालाला योग्य भाव', या एककलमी कार्यक्रमाखाली कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिकांना भाव मिळण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची शेतकरी आज देखील आठवण काढतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शरद जोशी यांनी वारंवार उपोषणे केली. प्रसंगी तुरुंगवास देखील भोगले.
महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलने उभारली. स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी शरद जोशी यांनी 'स्वतंत्र भारत पक्षा'ची 1994 मध्ये स्थापना केली. एवढेच नाही तर शरद जोशी यांनी स्त्रीयांच्या प्रश्नांवर देखील वेळो-वेळी आवाज उठवला. अशा लढवय्या नेत्याचे 12 डिसेंबर 2015 रोजी पुण्यामध्ये निधन झाले.
शरद जोशींबद्दल महत्वाच्या गोष्टी
3 सप्टेंबर 1935 रोजी साताऱ्यातील सज्जनगड येथे जन्म
6 जून 1951 ला मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालयातून अकरावीची परीक्षा उत्तीर्ण
28 जून 1957 ला मुंबईच्या सिडनम महाविद्यालयातून एम. कॉम. उत्तीर्ण
1 ऑगस्ट 1958 ला भारतीय टपाल खात्यामध्ये नोकरीला सुरूवात
25 जून 1961 ला मुंबईच्या लीला कोनकर यांच्याशी विवाह
30 एप्रिल 1968 ला भारतीय टपाल खात्यातील नोकरीचा राजीनामा
1 मे 1967 ला स्वित्झरलँड मधील नोकरी सोडून भारतात परतले
1 जानेवारी 1977 ला पुण्यातील खेड तालुक्यातील आंबेठाण येथे शेती घेऊन राहिला आले
25 मार्च 1978 ला पुण्याच्या चाकणमध्ये पहिले कांदा आंदोलन
8 ऑगस्ट 1979 साली शेतकरी संघटनेची स्थापना
31 ऑक्टोबर 1982 ला शरद जोशी यांच्या पत्नी लीला जोशी यांचं पुण्यात निधन
12 डिसेंबर 2015 ला पुण्यामध्ये शरद जोशींचे निधन झाले
शेतकरी संघटनेची मोठी आंदोलने
24 जानेवारी 1980 ला वांद्रे चाकण रस्त्यासाठी 64 किलोमीटरचा महामोर्चा
1 मार्च 1980 ला चाकणमध्ये कांद्याच्या आंदोलनात पहिला रास्तारोको
10 नोव्हेंबर 1980 ला खेरवाडी मधील रेल रोको आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा गोळीबरात मृत्यू झाला. शेतकरी संघटनेकडून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
11 नोव्हेंबर 1980 ला शरद जोशी यांच्यासह 31 हजार शेतकऱ्यांना अटक झाली.
6 एप्रिल 1981 ला पोलिस गोळीबारात बारा शेतकरी शहीद झाले आणि शरद जोशींना बेल्लारीच्या तुरुंगामध्ये टाकलं
1 जानेवारी 1982 ला शेतकरी संघटनेचे सटाणा येथे पहिले अधिवेशन, तीन लाख शेतकरी हजर
12 मार्च 1984 ला पंजाबच्या चंदीगड येथे राजभाऊंना वेडा घातला. यावेळी शरद जोशी यांच्यासह एक लाख शेतकरी हजर होते
2 ऑक्टोबर 1985 ला राजीववस्त्र विरोधी आंदोलन, राज्यभरात 250 ठिकाणी राजीव वस्त्रांची होळी
6 ऑक्टोबर 1985 नगरच्या राहुरीमध्ये ऊस परिषद झाली. याला चरण सिंग, शरद पवार, प्रमोद महाजन यांची हजेरी
9 नोव्हेंबर 1986 ला चांदवडमध्ये पहिले महिला अधिवेशन झाले या अधिवेशनात 3 महिलांनी सहभाग घेतला..
10 नोव्हेंबर 1986 हिंगोलीच्या सुरेगाव मध्ये कापसाचे आंदोलन झाले. तिथे पोलिस गोळीबरात काही शेतकरी ठार झाले.
15 फेब्रुवारी 1987 मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी 25 हजार शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
1 मे 1989 ला दारू दुकान बंदी आंदोलन झाले.
14 मार्च 1990 ला व्ही.पी. सिंग यांनी शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सल्लागार समिती स्थापन केली
6 नोव्हेंबर 1994 ला नागपूर मध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना झाली
12 मार्च 1999 ला शेतकऱ्यांची कंपनी भाभा उद्योग नगरीचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
4 डिसेंबर 1999 ला गुजरात मधील नर्मदा जन आंदोलन
12 सप्टेंबर 2000 ला शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली अटल बिहारी वाजपेयी यांनी कृषी टास्क फोर्सची स्थापना केली
15 नोव्हेंबर 2002 ला शरद जोशींनी तीन महिन्याच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली
7 जुलै 2004 ला शरद जोशी राज्यसभेवर खासदार झाले
8 नोव्हेंबर 2013 ला चंद्रपूर मध्ये शेतकरी संघटनेचे 12 व्या अधिवेशन झाले. हे शरद जोशींचे शेवटचे अधिवेशन होते
25 नोव्हेंबर 2014 ला मुंबईमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला