एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पशुवैद्यकीय डॉक्टरवरच मृत वाघाच्या अवयव तस्करीचा आरोप
अपघातात मृत्यू झालेल्या एका वाघाचे अवयव रुग्णालयातूनच चोरीला गेल्याचा गंभीर आरोप झाल्यानं नागपुरात खळबळ माजली आहे.
नागपूर : अपघातात मृत्यू झालेल्या एका वाघाचे अवयव रुग्णालयातूनच चोरीला गेल्याचा गंभीर आरोप झाल्यानं नागपुरात खळबळ माजली आहे.
पशवैद्यकीय डॉक्टर बहार बाविस्कर यांनी वाघाचे अवयव चोरुन नेल्याचा आरोप वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी केला आहे. कुंदन हाते यांनी आरोपांचा दाखला म्हणून एका सीसीटीव्ही फुटेजचाही दाखला दिला आहे.
डॉक्टर बहार बाविस्कर ज्याठिकाणी वाघाचं शवविच्छेदन होणारं होतं, त्या रुममध्ये जातात आणि तिथून ज्या बाटलीमध्ये वाघाचे काही अवयव होते, ती बाटली स्वतःसोबत घेऊन बाहेर पडतात. कळमेश्वर वनपरिक्षेत्रातल्या महामार्गावर वाघाच्या अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह नागपूरच्या सेमिनरी हिल्स इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी आणला गेला होता.
दरम्यान, डॉ. बहार बाविस्कर यांनी कुंदन हाते यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement