एक्स्प्लोर

गोरक्षण संस्थेने मृत गायी जंगलात फेकल्या, ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त तर वन्यप्राण्यांना मेलेल्या गायींचे रोग होण्याची भीती

मृत गायी संस्थेने जुनोना जंगलातील तलाव भागात फेकून विल्हेवाट लावल्याचे बोलले जात आहे. लोहारा जंगलात या गायी टाकून दिल्याने परिसरातील ग्रामस्थ प्रचंड दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या लोहारा-जुनोना जंगलात मृत झालेल्या गायींना जंगलात अक्षरशः फेकून देत विल्हेवाट लावली आहे. या भागात वन्यजीवांनी या मृत गायींवर ताव मारायला सुरुवात केली आहे. याच भागात असलेल्या एका गोरक्षण संस्थेने मेलेल्या गायींची अशी विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले असून गायींना असलेले रोग वन्यजीवात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यासोबतच वाघांवर विषप्रयोग करण्यासाठी गायींचा वापर होण्याचा धोका असल्याने वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर शहराजवळ लोहारा या गावी उज्ज्वल गोरक्षण संस्थेची एक गोशाळा आहे. लोकांच्या अनुदानावर ही संस्था गोशाळेतील जनावरांचा सांभाळ करते. देशात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यावर चंद्रपूरसारख्या सीमावर्ती जिल्ह्यात मोठ्या संख्येत जनावरे तस्करीची प्रकरणे उजेडात येत आहेत. ही सर्व जनावरे लोहारा येथील संस्थेत पोचविली जातात. नुकतीच राजुरा भागात सुमारे 200 गुरांची तस्करी पोलिसांनी पकडली यातील 50 हुन अधिक जनावरे मृत आढळली. या मृत गायी संस्थेने जुनोना जंगलातील तलाव भागात फेकून विल्हेवाट लावल्याचे बोलले जात आहे. लोहारा जंगलात या गायी टाकून दिल्याने परिसरातील ग्रामस्थ प्रचंड दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. त्यांनीही या प्रकाराबाबत वनविभागाला तक्रारी केल्या. विशेष म्हणजे हा भाग सध्या 'वाघडोह मेल' या नावाने परिचित असलेल्या ताडोबा परिघातील सर्वात मोठ्या वाघांचे वास्तव्य स्थान आहे. गोरक्षण संस्थेने मृत गायी जंगलात फेकल्या, ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त तर वन्यप्राण्यांना मेलेल्या गायींचे रोग होण्याची भीती काही हौशी वन्यजीव प्रेमी या भागात रात्री फिरत असतांना त्यांना वाघ या गायींवर ताव मारताना दिसला. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर वन्यजीव अभ्यासकांनी या स्थळाची पाहणी केल्यावर त्यांना धक्काच बसला. गोरक्षण संस्थेने सुमारे डझनभर मृत गायी या जागी फेकून विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. संस्थेचा हा बेजबाबदारपणा असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. या कृत्यामुळे गायींना असलेले रोग जंगलात पसरण्याची भीती असून वाघांवर विषप्रयोग करण्यासाठी गायींचा उपयोग होण्याचा धोका असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. याआधी देखील गोरक्षण संस्थेने असे प्रकार केले होते. विशेष म्हणजे वनविभागाचे या साऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष असून या जंगलात वनविभागाची साधी गस्त देखील नाही. फेकून दिलेल्या मृत गाईंच्या बाजूने गोंदियाला जाणारी रेल्वेलाईन आहे. याच भागात काही दिवसांपूर्वी  वाघांचे 3 बछडे रुळावर कटून मृत झाले होते. हे जंगल ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या वनविकास महामंडळाने गोरक्षण संस्थेला याआधी नोटीस देखील दिली होती. मात्र कारवाई न झाल्याने पुन्हा अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याची पुनरावृत्ती झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget