एक्स्प्लोर

मी येत आहे सीमोल्लंघनासाठी... पंकजांकडून दसरा मेळाव्याची अखेर घोषणा

संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या सावरगावातील गावकऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी सावरगावात दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड : भगवानगडावर यंदाचा दसरा मेळावा होणार नाही, हे अखेर स्पष्ट झालं आहे. कारण संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या सावरगावातील गावकऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी सावरगावात दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ''कर्मभूमी नाही, तर भगवान बाबा तुमची जन्मभूमी बोलवत आहे. जन्मस्थळाची माती लावून नवीन अध्याय सुरु करत आहे. दसरा मेळाव्यासाठी सावरगावात येत आहे'', असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. https://twitter.com/Pankajamunde/status/913438516616495104 भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा विरोध होता. पंकजांनी सामंजस्याची घेतलेली भूमिकाही त्यांनी नाकारली. त्यानंतर आज कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली. त्यानंतर सावरगावच्या गावकऱ्यांनी पंकजांना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिलं. पंकजांनी आपण दसरा मेळाव्याला येत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर समर्थक आता जोमाने दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. दसरा दोन दिवसांवर आला असतानाही ठिकाण निश्चित न झाल्याने मुंडे समर्थकांच्या मनात संभ्रम होता. अखेर हा संभ्रम दूर झाला आहे. भगवानगड दसरा मेळावा वाद काय आहे? दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा यापुढे होणार नाही, अशी भूमिका गेल्या वर्षीपासून घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेनंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी समर्थकांना संबोधित केलं. यावर्षीही हा वाद कायम आहे. एकीकडे मुंडे समर्थक दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे गडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर्षी गडावर दसऱ्याला कोणत्याही व्हीव्हीआयपीला परवानगी देण्यात येऊ नये, असं पत्र नामदेव शास्त्रींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. पंकजा मुंडेंनीही समाजासाठी वर्षातून केवळ 20 मिनिटं गडावर येण्याची परवानगी द्यावी, असं पत्र नामदेव शास्त्रींना लिहिलं. मात्र त्यांनी ही विनंती अमान्य केली. त्यानंतर सावरगावातील गावकऱ्यांनी दसरा मेळाव्यासाठी भगवान बाबांच्या जन्मभूमीत येण्याचं निमंत्रण दिलं. हे निमंत्रण स्वीकारत पंकजा मुंडेंनी गडाऐवजी सावरगावात दसरा मेळावा घेण्याची नवी परंपरा सुरु केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget