Pankaja Munde Speech Live : लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे
Dasara Melava 2024 Live Updates : राज्यात आज चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत, या चारही दसरा मेळाव्यांचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर.
मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही
मी कुणालाही घाबरत नाही
माझं भाषण ऐकायला आल त्यांना मी घाबरते
मला तुमच्यासाठी भांडायचं आहे. मला तुमच्या गावापर्यंत रस्ते करायचे आहेत- पंकजा मुंडे
त्याला मी म्हटलंय तुझ्या पेक्षा जास्त मला इथली जनता प्रिय आहे
gst ची रेड पडली तेव्हा या लोकांनी 12 कोटी जमा केले
माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिला
इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता
लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू
माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही
पण त्यांनी सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथ स्वागत करते
पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात
पंकजा यांनी हिंदीतून कविता म्हणत भाषणाला सुरुवात
या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे- धनंजय मुंडे
आपलं भलेही 12 वर्षे जमलं नसेल. पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा. आज दसरा मेळाव्याला आलेला समुदाय एकसंघ झाला तर मी आपल्याला सांगतो की कोणीही नवा दसरा मेळावा चालू करून या मेळाव्याची पवित्रता घालवू शकत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं आहे- धनंजय मुंडे
भगवानगडाच्या भूमिपूजनाला 1907 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे या गडालाही भगवान गड असेच नाव हवे, असे यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. दसरा मेळाव्याची परंपरा फक्त बीड जिल्ह्यात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला मुंबईतील दसरा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचाही मेळावा आहे. भगवानगडावरचाही एक दसरा मेळावा आहे. लोकशाही आहे. मी म्हणालो आनंद आहे. दसरा ज्याला माहिती आहे, त्याला प्रभू रामचंद्रही माहिती असायला हवेत. त्यामुळे पुढचं मी काही बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या- धनंजय मुंडे
छत्रपती शिवाजी महाराजांचं राजं कोणत्याही एका जातीसाठी नव्हतं. ते राज्य अठरापगड जातींसाठी होतं. संत भगवान बाबांनी आपल्याला अध्यात्म शिकवलं. ते अध्यत्म कोणत्याही एका जातीसाठी नव्हतं. ते अध्यात्म अठरापगड जातींसाठी होतं- धनंजय मुंडे
वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही. तुमची मान खाली घालू देणार नाही- मनोज जरांगे
आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो की सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऐकायचं. ते काय करतात हे सगळं पाहायचं. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचं. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच आहे.
क्षत्रीय मराठ्यांना लढायचं शिकवलं आहे. आल्यासमोर अन्याय करणारे असतील तर समोरच्यांना उखडून फेकावंच लागणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. सगळ्या जातींसाठी लढणारा हा समाज आहे.
मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरले आहेत. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. समाज सांभाळा. मला चारही बाजूने घेरलं आहे- मनोज जरांगे
मी आज अन्यायाविरोधील एक गोष्ट सांगणार आहे. लढायचं शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.
आम्ही नेमकं काय केलं आहे. एक महत्त्वाचा विषय सांगतो. हा विषय जातीत आणि राजकारणात मोडत नाही म्हणून त्याचा इथे उल्लेख करतो. आम्ही कधीच गप्प बसत नाही. कारण आम्ही क्षत्रीय मराठे आहोत. मी फार विचित्र प्राणी आहे. माझ्या एखाद्या शब्दामुळे माझ्या समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून मी बोलत नाही.
आम्ही नेमकं काय केलं आहे. एक महत्त्वाचा विषय सांगतो. हा विषय जातीत आणि राजकारणात मोडत नाही म्हणून त्याचा इथे उल्लेख करतो. आम्ही कधीच गप्प बसत नाही. कारण आम्ही क्षत्रीय मराठे आहोत. मी फार विचित्र प्राणी आहे. माझ्या एखाद्या शब्दामुळे माझ्या समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून मी बोलत नाही.
मला तुमच्याकडून एकच वचन हवंय. फक्त हट्ट करून नका. मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला ते करावंच लागेल. मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. मी आता त्यांना माझा इंगा दाखवतो. ते नाटकं करत आहेत.
जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळी उलथापालथ करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकारव टिच्चून कुठला निर्णय होणार असेल आणि या राज्याच्या समाजावर अन्याय होणार असेल गाडावच लागणार. शेवटी आपल्याला आपला समूदाय महत्तवाचा आहे. जनता महत्त्वाची आहे. आपल्यासाठी आपला शेतकरी महत्त्वाचा आहे.
तुमचे लेकरं अधिकारी बनलेले पाहायचे आहेत. आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र आपले लेकरं प्रशासनात घातल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपल्याला डावललं जातंय. आपल्यावर अन्याय होतोय- मनोज जरांगे
मनोज जरांगे यांचे भाषण लाईव्ह
मराठा समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही कोणावर जातीभेद करत नाही. हा समुदाय मस्तीत, मग्रुरीत वागला नाही. या समाजाने प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं. या समाजाने कधीच जातीवाद केला नाही. या समाजाला जात कधी शिवली नाही. मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे यांचे नारायणगडावरील भाषण चालू झाले आहे.
त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शब्दांच्या रुपात शिवाजी महाराजांना मुजरा केला.
जमलेल्या लोकांचे आभार मानले.
मनोज जरांगे यांची नारायणगड येथे जाहीर सभा होत आहे.
मनोज जरांगे यांचा हा दसरा मेळावा आहे.
थोड्याच वेळात ते त्यांच्या समर्थकांना संबोधित करतील.
पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या आहेत.
याच गडावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
काही क्षणात पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांन संबोधित करणार आहेत.
मावळतीच्या किरणांच्या साक्षीने आज करवीर संस्थानाचा शाही दसरा सोहळा पार पडणार आहे... साधारण 6 वाजून 10 मिनिटांनी हा दसरा सोहळा पार पडेल... मैसूर संस्थानाच्या शाही दसऱ्याप्रमाणे कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला खूप महत्त्व आहे...हा शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक कोल्हापूरमध्ये येत असतात. छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य मेबॅक कार मधून दसरा चौकात पोहोचतात... त्या ठिकाणी सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो...त्यानंतर शाहू महाराज संपूर्ण करवीर वासियांची भेट घेत असतात... या दसरा सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....
आझाद मैदानात होणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल.
अझाद मैदानाच्या आसपास महापालिका रोडवर वाहतुकीस बंदी.
अझाद मैदान परिसरात पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने मेळाव्यास येणाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे पोलिसांचे आवाहन.
पर्यायी मार्ग म्हणून वासुदेव बलवंत चौकातून पुढे मेट्रोकडून हुतात्मा चौकात जाणाऱ्या रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन
एम जी एम रोड, महापालिका रोड आणि हजारीमल सोमानी मार्गावर नो पार्किंग झोन..
पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पाहा लाईव्ह
बीडमधील नारायणगडावर मनोज जरांगे थोड्याच वेळात दाखल होणार
मराठा समाज नारायणगडावर मोठ्या प्रमाणावर दाखल
थोड्याच वेळात मनोज जरांगे यांचे भाषण होणार
नागपुर आरएसएसचा विजयादशमी सोहळा!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाचा मानला जाणारा विजयादशमी उत्सव आज नागपुरात उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. राधाकृष्णन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर शस्त्रपूजन पार पडले,
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अनेक महत्वांच्या बाबींवर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, यंदा संघ स्थापनेच्या 100 व्या वर्षात प्रवेश करत आहे.
देश बलशाली व्हायचा असेल तर प्रजेत चारित्र्य असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय चारित्र्याच्या जोरावर देश मोठा होतो.
बांगलादेशमध्ये अनुकुल चंद्र ठाकूर यांनी तेच प्रयत्न केले होते,
असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कसा असेल ?
ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असेल
शिवतीर्थवर येणाऱ्या साधारण ६० हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात येतील
शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येतील जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण ऐकता येतील
शिवतीर्थ शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी भगवमय करण्याची तयारी केली आहे
सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भाषणे होतील
प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन सोने वाटप आणि रावण दहन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणांना सुरुवात होईल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून रणशिंग फुंकले जाईल
आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदुत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे ..
मोदी-शाह यांचे महाराष्ट्र दौरे, भाजप नेतृत्व आणि महायुतीकडून केली जाणारी वक्तव्य याचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे
शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे
* पोलिसांचा तगडा बंदोबस्त दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, ६० अधिकारी व जवळपास ३०० कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत
दसरा मेळाव्याकरिता येणाऱ्या शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बंगा अथवा अन्य वस्तू घेऊन येऊ नये, असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे पालन तंतोतंत करावे. तसेच शिवाजी पार्क मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना पोलीस सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.
शिवसेना शिंदे गट दसरा मेळावा नियोजन
पंचवीस हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था आझाद मैदानात करण्यात आलीय
स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत
वीस बाय साठ चा भव्य मुख्य स्टेज बनवण्यात आलाय
तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी स्टेजवर आसन व्यवस्था करण्यात आलीय
पावसामुळे मैदानात चिखल झालाय तिथे प्लायवूडच्या पाट्या टाकण्यात आल्यात
आझाद मैदान परिसरामध्ये खाण्यापिण्यासाठी आणि शौचालयासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे
राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची वाहनं बेलार्ड पिअर, काला घोडा, मुंबई युनिव्हर्सिटी परिसर, चर्चगेट परिसर आणि सीएसएमटी स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे
आझाद मैदानात दसरा मेळाव्यामुळे पर्यायी मार्ग
१) अ) छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन :- छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) डि. एन रोड – एल. टी. मार्ग – वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन)
ब) वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (सि.एस. एम. टी जंक्शन ) :- वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) एल. टी. मार्ग चकाला जंक्शन – उजवे वळण – डी. एन. रोडने सी.एस.एम.टी. अशी वळविण्यात येईल.
२. अ) चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) :- चाफेकर बंधू चौक (ओ.सी. एस. जंक्शन) उजवे वळण – हुतात्मा चौक – उजवे वळण – रामदेव पोद्दार चौक (सि.टी.आ. जंक्शन)- अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) उजवे वळण – एम. के. रोड – आनंदीलाल पोद्दार -उजवे वळण वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) मार्ग पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
ब) वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते हुतात्मा चौक :- वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्श न) – आनंदीलाल पोतदारमार्ग – डावे वळण महर्षि कर्वे रोड – अहिल्याबाई होळकर चौक – डावे वळण – रामदेव पोतदार चौक – वीर नरीमन रोडने पुढे हुतात्मा चौक मार्गे पुढे जाता येईल
३. चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन): – चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) उजवे वळण हुतात्मा चौक काळा घोडा जंक्शन – रिगल जंक्शन – डावे वळण – एस.बी.एस. रोडने पुढे इच्छित स्थळी जाता येईल
४. वालचंद हिराचंद मार्ग (बेलार्ड पिअर) एकदिशा मार्ग करण्यात येत आहे. अवतारसिंग बेदी जंक्शत ते भारत पेट्रोल पंप एक दिशा
५. अलायटिंग पॉईंट (चढ-उतार थांबे):- दसरा मेळाव्याकरीता बसेमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांना खालीलप्रमाणे अलायटिंग पॉईंट देण्यात आलेले आहेत.
१) वालचंद हिराचंद मार्ग (बेलार्ड पिअर), २) हॉर्निमल सर्कल, ३) के. बी. पाटील मार्ग, ४) गेट नं १८ सी.एस.एम. टी. रेल्वे स्थानक
विजयादशमीचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नाशिक शहरात संचलन करण्यात आले. शहरातील 22 प्रमुख भागात संचलन पार पडलं. यंदाही पारंपारिक गणवेशात तालबद्ध शिस्तबद्ध संचलन पार पडले. संचलनामध्ये घोषसह भगवा ध्वज आणि सुदंड रक्षक हे वैशिष्ट्य पाहायला मिळाले,संचलन मार्गावर फुलांच्या रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. पंचवटी,सातपूर,इंदिरानगर , गंगापूर रोड, नाशिक रोड, नवीन नाशिक अशा शहरातील 22 हून अधिक ठिकाणी हे संचलन पार पडल.
तुम्हाला गृहित धरण्यात आलं आहे. तुम्हाला गृहित धरणं यामुळेच महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. तरुणांना, तरुणांना, शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, दसऱ्यानंतरच्या निवडणुकीत बेसावध राहून नका. झाडावरची शस्त्रं आता उतरवा. आता क्रांतीची वेळ, वचपा घेण्याची वेळ आहे. शस्त्र उतरवून तुम्हाला त्यांचा वेध घ्यावा लागणार आहे. मी एका महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय. ते साकारण्याची संधी माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना मिळू देत. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडावा हेच माझं स्वप्न. ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांचा वेध घ्या- असे राज ठाकरे म्हणाले.
तुमच्या हातात मतदानाचं शस्त्र आहे. हे शस्त्र तुम्ही मतदानाच्या दिवशी तुम्ही वापरत नाही. तुम्ही नुसते शस्त्र वर ठेवता. निवडणुका संपल्या की तुम्ही हे शस्त्र बाहेर काढता. मतदानाच्या दिवशी या शस्त्रांचा वापर का होत नाही. हा माझ्या जातीचा, हा माझ्या जवळचा असं म्हणून राज्य, राष्ट्र उभं राहात नाही. आज संधी आली आहे. मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही सर्वांना संधी दिली आहे. आपला मेळावा होणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला याविषयी सविस्तर सांगणार आहेच. या निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे.
दरवर्षी तुम्ही बेसावध राहता. महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे हे तुम्ही सांगा. नुसते पूल, रस्ते बांधणे म्हणे प्रगती नव्हे. प्रगती समाजाची व्हावी लागते. अजूनही आपण चाचपडत आहोत. असे असूनही मला तुमच्यातील राग व्यक्त होताना दिसत नाही. तुम्ही त्याच-त्याच व्यक्तीला निवडून देता. तुम्ही ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही शस्त्र झाडावर नेऊन ठेवता.
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आज आझाद मैदानामध्ये पार पडत आहे. याची जय्यत तयारी सध्या आझाद मैदानामध्ये सुरू आहे. शिवसैनिक सकाळपासून आझाद मैदान परिसरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संघाच्या शाखेत सामील
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संघाच्या शाखेत सामील
कुलाबा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नार्वेकरांनी लावली हजेरी
नार्वेकर यांच्या सोबतच माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर ही उपस्थित
आज नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जात आहे ..
त्यासाठी देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी नागपूरला पोहचले आहे ...
1956 मध्ये आजच्याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा पासून दीक्षाभूमी येथे विजयादशमीला धम्मचक्र दिन म्हणून साजरा करतात ...
यावेळे शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची परंपरा आहे
68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नागपुरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन
अनेक भीमअनुयायी आज नागपुरातज जमणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज शिवतीर्थ मैदानामध्ये पार पडणार आहे. याची जय्यत तयारी ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईत दोन दिवस पाऊस पडल्यामुळे मैदानात चिखल झालेला आहे. पाऊस चिखल काहीही असो तरी देखील हा मेळावा पार पडेल आणि आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणशिंग उद्धव ठाकरे याच मैदानातून फुंकतील. शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याचा तयारीचा आढावा घेतलाय छत्रपती शिवाजी पार्क मैदानामधून आमचे प्रतिनिधी यांनी
रेशीम बाग परिसरात पावसाची रिपरिप
कवायतीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल
संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात बसून करावयाच्या कवायती होणार नाहीत.
थोड्याच वेळात सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार
रेशीमबागेत संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित
नागपुरात सकाळपासूनच पावसाची रिप्रीप सुरू असल्यामुळे रेशीम बाग मैदानावर प्रचंड चिखल झाला आहे....
परिणामी येणाऱ्या पाहुण्यांना त्रास होऊ नये, म्हणून कार्यक्रमाच्या वेळात काहीशी कपात करण्यात आली आहे...
सामान्यपणे विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात सुरुवातीला स्वयसेवकांकडून रेशीम बाग मैदानावर शारीरिक कवायतींचे प्रात्यक्षिक केले जातात... मात्र आज मैदानावर चिखल असल्यामुळे फक्त उभे राहून करावयाच्या कवायती केल्या जातील... बसून केल्या जाणाऱ्या कवायती आज रद्द करण्यात आल्या आहे...
बीड जिल्ह्यात होत असलेल्या पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यातून पोलिसांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला आहे. नारायणगड आणि सावरगाव घाट यासह प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान या दोन्ही मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरातील रेशीम बाग मैदानावर पार पडणार आहे... सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रेशीमबाग मैदानावरील मुख्य सोहळा सुरू होईल.. त्यापूर्वी संघाच्या स्वयंसेवकांचा रेशीम बाग आणि जवळपासच्या परिसरात पथसंचलन होणार आहे... संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन हे संगम टॉकीज जवळ स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचं अवलोकन करणार आहेत....
पार्श्वभूमी
Dasara Melava 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज दसऱ्यानिमित्त राज्यभरात होणाऱ्या चार दसरा मेळाव्यांना चांगलेच महत्त्व आले आहे. या दसरा मेळाव्यातून एका प्रकारे प्रचाराचे रणशिंगच फुंकले जाणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचे मेळावे होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यांत हे बडे नेते नेमकी कोणती घोषणा करणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व दसरा मेळाव्यांची तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -