Dasara Melava 2023 Live : कोणी कुठे आणि किती दसरा मेळावे घ्यावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न : धनंजय मुंडे

Dasara Melava 2023 Live Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील दसऱ्याचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Oct 2023 02:47 PM
Dasara Melava 2023 : Uddhav Thackeray पुन्हा मुख्यमंत्री होवो, जालन्यावरुन मशाल घेऊन शिवसैनिक मुंबईत

Dasara Melava 2023 : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होवो असं म्हणत जालन्यावरुन मशाल घेऊन शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.

Dhananjay Munde On Dasara Melava : कोणी कुठे आणि किती दसरा मेळावे घ्यावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न : धनंजय मुंडे

Dhananjay Munde On Dasara Melava : महाराष्ट्रातील जनता आणि शेतकऱ्यांवर जी संकट येणार आहेत त्या संकटात येत्या काळामध्ये दहन व्हावं अशी भावना धनंजय मुंडे यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे. यावर्षी दसरा मेळाव्याची संख्या वाढली असून यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की दसरा मेळावा कोणी घ्यावा आणि कुठे घ्यावा हा ज्याचा त्याचा विषय आहे.  कोणी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतो तर कोणी आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी  नतमस्तक होत असतो. 

Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Dasara 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला (Dasara 2023) हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. आज देशभरात दसऱ्याचा सण साजरा होत आहे. बॉलिवूडकरदेखील धुमधडाक्यात दसऱ्याचा सण साजरा करत आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात आलिया भट्ट (Alia Bhatt), कतरिना कैफ (Katrina Kaif) अक्षय कुमार (Akshay Kumar) या सेलिब्रिटींचा समावेश आहे. 


Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात

Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. भगवान बाबा की जय म्हणत पंकज मुंडेंच्या भाषणाला सुरुवात झाली.

Kolhapur Dasara : कोल्हापूरच्या दसरा चौकात आज पार पडणार शाही सोहळा

Kolhapur Dasara : कोल्हापूरच्या दसरा चौकात आज शाही सोहळा पार पडणार आहे. ,17 फूट लांब,6 फूट रूंद असलेली मेबॅक कार सोहळ्याची शान असणार आहे. 

CM Eknath Shinde Dasara Melava : पुण्यातून 35 बसेसमधून शिवसैनिक शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना

CM Eknath Shinde Dasara Melava : पुण्यातून 35 बसेसमधून शिवसैनिक शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाल्या आहेत. शिंदेंच्या मेळाव्यासाठी सिल्लोडहून शेकडो बसेस मुंबईत दाखल झाल्या आहेत. 

Rajnath Singh : भारत चीन सीमेवर संरक्षणमंत्र्यांचं शस्त्रपूजन,आर्मीच्या जवानांसह विजयादशमी साजरी

Rajnath Singh : भारत चीन सीमेवर संरक्षणमंत्र्यांचं शस्त्रपूजन,आर्मीच्या जवानांसह विजयादशमी साजरी करण्यात आली आहे.


Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कजवळ शेकडो पोलिसांचा बंदोबस्त, दसरा मेळाव्यासाठी मेगा प्लॅन

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवाजी पार्कजवळ शेकडो पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी मेगा प्लॅन बनवण्यात आला आहे.

Mumbai Police Pooja : शिवाजी पार्कमध्ये ऑन ड्युटी असताना पोलिसांकडून शस्त्रांची पूजा

Mumbai Police Pooja : शिवाजी पार्कमध्ये ऑन ड्युटी असताना पोलिसांनी शस्त्रांची पूजा केली आहे.


Sanjay Raut On Dasara Melava : 'त्या' रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्या शिवाय राहणार नाही : संजय राऊत

Sanjay Raut On Dasara Melava : रावण हा अहंकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. दसरा मेळावा त्या रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्या शिवाय राहणार नाही . 2024 साली दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते बसले असतील. तुमचा पुढील दसरा मेळावा होणार नाही.

Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्याला त्री अब्दुल सत्तार 20 हजार कार्यकर्त्यांसह रवाना

Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरून मंत्री अब्दुल सत्तार 20 हजार कार्यकर्त्यांसह निघाले असून  शेकडो बस एका रांगेत निघाले आहेत. मुख्यमंत्री दसरा मेळाव्यात काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Pankaja Munde Dasara Melava Live Updates : पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष

Pankaja Munde Dasara Melava Live Updates : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीडमध्ये दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या दसरा मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी मनमाडहुन कार्यकर्ते शिवतीर्थावर रवाना

Dasara Melava : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकच्या  मनमाड येथून शिवसैनिक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.ढोल - ताशा व संबळ या पारंपारिक वाद्याच्या तालावर नृत्य करीत  मनमाड - सीएसएमटी गोदावरी एक्सप्रेसने शिवतीर्थाकडे रवाना झाले. दसरा मेळाव्याला जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बळ देण्यासाठी शिवतीर्थावर जात असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Mohan Bhagwat On 2024 Election : राज्यात आता निवडणुका असून मतदान करणं प्रत्येकाचं कर्तव्य : मोहन भागवत

Mohan Bhagwat On 2024 Election : राज्यात आता निवडणुका असून मतदान करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. रागाच्या भरात मतदान करू नका. देशाची एकता, अखंडता, अस्मिता आणि विकास या मुद्द्यांचा विचार करून प्रत्येकाने मतदान करावे.

Mohan Bhagwat : समाजात कटुता निर्माण झाली आहे : मोहन भागवत

Mohan Bhagwat  : समाजात कटुता निर्माण झाली आहे. आज मला घर घ्यायचं असेल तर माझ्या गावी जावं लागतं. घर मिळेनासे झाले आहेत. 

Mohan Bhagwat On RSS Dasara Nagpur2023 : राम मंदिराचं उद्धाटन 22 जानेवारीला होणार : सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat On RSS Dasara Nagpur2023 : रामाचा फोटो आपल्या संविधानाच्या पहिल्या पानावर आहे, त्याचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जात आहे, त्याचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. आपण सगळे जाऊ शकणार नाही, पण आजूबाजूच्या मंदिरात जाऊ शकतो. आपण देशात धार्मिकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
 

Mohan Bhagwat On RSS Dasara Nagpur2023 : राम मंदिराचं उद्धाटन 22 जानेवारीला होणार : सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat On RSS Dasara Nagpur2023 : रामाचा फोटो आपल्या संविधानाच्या पहिल्या पानावर आहे, त्याचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जात आहे, त्याचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. आपण सगळे जाऊ शकणार नाही, पण आजूबाजूच्या मंदिरात जाऊ शकतो. आपण देशात धार्मिकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
 

Mohan Bhagwat On RSS Dasara Nagpur2023 : राम मंदिराचं उद्धाटन 22 जानेवारीला होणार : सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat On RSS Dasara Nagpur2023 : रामाचा फोटो आपल्या संविधानाच्या पहिल्या पानावर आहे, त्याचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जात आहे, त्याचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. आपण सगळे जाऊ शकणार नाही, पण आजूबाजूच्या मंदिरात जाऊ शकतो. आपण देशात धार्मिकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
 

Mohan Bhagwat On RSS Vijayadashami : देशाची शान वाढवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत : मोहन भागवत

Mohan Bhagwat On RSS Vijayadashami : देशाची शान वाढवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत.  G20 परिषद हे त्याचे एक उदाहरण आहे. जगाने आमचे राजकीय कौशल्य पाहिले आहे. आपल्या नेतृत्वामुळे आपण जगातील मोठ्या देशांपैकी एक झालो आहोत. आशियायी स्पर्धेक अनेक पदके मिळाली आहेत. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आलो आहोत.


 
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरुवात

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.


Shankar Mahadevan On RSS Dasara : जगात कुठे ही जा, अभिमानाने म्हणा मी भारतीय आहे : शंकर महादेवन

Shankar Mahadevan On RSS Dasara : जगात कुठे ही जा, अभिमानाने म्हणा मी भारतीय आहे, असं म्हणत शंकर महादेवन यांनी देश से हैं प्यार तो हर पल यह कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत यह रहना चाहिए.. सिलसिला मेरे बाद भी यह चलना चाहिए या गाण्याने आपल्या भाषणाचा शेवट केला.

Shankar Mahadevan On RSS Dasara : तरुण पिढीला संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख झाली पाहिजे : शंकर महादेवन

Shankar Mahadevan On RSS Dasara : तरुण पिढीला संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख झाली पाहिजे. कट्यार काळजात घुसली संगीतबद्ध करताना हेच विचार मनात होते. आज विविध ठिकाणी लहान मुले ही गाणी गात आहेत. संघात मला योगदान देता आलं तर मी नक्कीच देईन. 

Shankar Mahadevan On RSS Dasara : संघाच्या निमंत्रणानंतर जगभरातील लोकांनी माझे अभिनंदन केले : शंकर महादेवन

Shankar Mahadevan On RSS Dasara : संघाच्या निमंत्रणानंतर जगभरातील लोकांनी माझे अभिनंदन केले. संघाचे आयोजन, मोहन भागवत यांचा साधेपणा पाहून थक्क झालो. आम्ही राजकारणी नाही. मात्र कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ही आमची जबाबदारी आहे. 

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागेत केलं शस्त्र पूजन; पाहा फोटो
Uddhav Thackeray Dasara Melava : दसरा मेळाव्याला सकाळपासूनच शिवसैनिक यायला सुरुवात

Uddhav Thackeray Dasara Melava : गटाच्या दसरा मेळाव्याला सकाळपासूनच अनेक शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे. यात पुण्याहून  मोहन यादव वडील आणि मुलगा उद्धव यादव बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देणारा रथ घेऊन शिवाजी पार्क मध्ये दाखल झाले आहेत.

Dasara Melava : : मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला अमरावती जिल्ह्यातून शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते रात्री अमरावती जिल्ह्यातून रवाना

 



Dasara Melava : : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आव्हानुसार दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबई येथे दाखल होत आहे. त्याच अनुषंगाने अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात सुद्धा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ट्रॅव्हल्स मध्ये शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत.


  Shinde Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना

  Shinde Dasara Melava : मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बसेस मधून शिवसैनिक मुंबईतील आझाद मैदानाकडे निघाले आहेत.. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शिवसैनिक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर येणार असून ठाकरेंच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला फारसे शिवसैनिक जाणार नाहीत असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईतील दसरा मेळावा कुणाचा मोठा होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागला आहे. 

RSS Vijayadashami : संघाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने पुढील वर्ष अत्यंत महत्वाचे असून संघ शताब्दी वर्षात कोणत्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता

RSS Vijayadashami : संघाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने पुढील वर्ष अत्यंत महत्वाचे असून संघ शताब्दी वर्षात कोणत्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Nagpur RSS Dasara : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा खास

 



Nagpur RSS Dasara : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. आरएसएसचे कार्यकर्ते या सोहळ्यात शिस्तबद्धरित्या सहभागी होतात. संघाच्या स्वयंसेवकांकडून पथसंचालनही पार पडतं. याशिवाय सरसंघचालक यावेळी शस्त्रांची पूजाही करतात. याचं एक खास कारणही आहे. संघाची स्थापना 1825 साली विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशीच झाली होती. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला आपण घरी करतो त्याप्रमाणे संघाच्या कार्यालयातही शस्रपूजन पार पडतं. संघाचे सरसंघचालक आणि इतर सदस्य शस्रांचं पूजन करतात. 9 दिवसांच्या उपासनेनंतर 10 व्या दिवशी दशमीला विजयाच्या कामनेनं शस्रांचं पूजन केलं जातं. 


RSS Vijayadashami : संघ सातत्याने सामाजिक समरसता या विषयावर लक्ष केंद्रित करत असून त्या अनुषंगाने काही महत्वाचे कार्यक्रम सरसंघचालक सुचवू शकतात

RSS Vijayadashami : गेले काही वर्ष संघ सातत्याने सामाजिक समरसता या विषयावर लक्ष केंद्रित करत असून त्या अनुषंगाने काही महत्वाचे कार्यक्रम सरसंघचालक सुचवू शकतात.

Mohan Bhagwat : सरसंघचालक मतदारांना करणार आवाहन

Mohan Bhagwat : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरसंघचालकांचा हा अखेरच्या विजयादशमी उद्बोधन राहणार आहे. त्यामुळे शंभर टक्के मतदान असा आवाहन मतदारांना करताना सरसंघचालक संघाच्या कोट्यवधी स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकीसाठी काय सूचना आणि संकेत देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Shankar Mahadevan : संघ चित्रपटसृष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे का? शंकर महादेवन यांच्या विजयादशमी उत्सवातील उपस्थितीमुळे चर्चांना सुरुवात

Shankar Mahadevan :  : यंदा संघाच्या विजयादशमी उत्सवात संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वरूपाने आणि भविष्यात सुद्धा संघ आजवर संघाचा फारसं काम आणि संपर्क नसलेल्या चित्रपटसृष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे का? चित्रपट सृष्टीतले काही चेहरे समाजातील इन्फ्लुएन्सर म्हणून संघाला उपयोगी वाटत आहेत का? अशी चर्चा शंकर महादेवन यांच्या संघाच्या विजयादशमी उत्सवातील उपस्थितीमुळे सुरू झाली आहे...

RSS Vijayadashami : संघ सातत्याने सामाजिक समरसता या विषयावर लक्ष केंद्रित करत असून त्या अनुषंगाने काही महत्वाचे कार्यक्रम सरसंघचालक सुचवू शकतात

RSS Vijayadashami : गेले काही वर्ष संघ सातत्याने सामाजिक समरसता या विषयावर लक्ष केंद्रित करत असून त्या अनुषंगाने काही महत्वाचे कार्यक्रम सरसंघचालक सुचवू शकतात.

RSS Dasara : शस्त्र पूजनाला सुरुवात; सरसंघचालक मोहन भागवत रेशीमबाग मैदानात दाखल

RSS Dasara : सरसंघचालक मोहन भागवत रेशीमबाग मैदानात दाखल झाले आहेत. तसेच शस्त्र पूजनाला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक यांच्या हस्ते शस्त्र पूजन नंतर स्वंयसेवकांच्या शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिक होतील.  त्यानंतर प्रमुख पाहुणे शंकर महादेवन यांचे आणि अखेरीस सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे उद्बोधन होईल.

पार्श्वभूमी

Dasara Melava 2023 Live Updates ३० ऑक्टोबर १९६६... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली... त्याला आता ५७ वर्ष झाली... या ५७ वर्षांत दरवर्षी बाळासाहेबांनी केलेल्या भाषणांनी पुढील काही दिवस महाराष्ट्र ढवळून निघायचा... मात्र आता परिस्थिती वेगळी आहे... दोन शिवसेना आहेत आणि दोन दसरा मेळावेही... आज उद्धव ठाकरेंची तोफ शिवतीर्थावरून धडाडणारेय. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येणारेत. तर दुसरीकडे, शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणारेय. त्यासाठी तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीडच्या सावरगाव येथेही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणारेय... महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडेंचा हा मेळावा होतोय. दरम्यान, उद्धव ठाकरेंची मशाल कुणाला धग देणार, तसेच, एकनाथ शिंदे धनुष्यातून कुणावर बाण सोडणार आणि पंकजा मुंडे मनातली खदखद मांडत कुणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.