ShivSena Dasara Melava Rally:  यंदाच्या दसरा मेळाव्याला मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. याचा कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. मात्र या उत्साहाला एका घटनेनं गालबोट लागलं आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील शिवसैनिक श्रीकृष्ण मांजरे यांचे दसरा मेळाव्याला जाताना वाटेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.


नाश्ता करायला उतरल्यावर आला हृदयविकाराचा तीव्र झटका


मृतक श्रीकृष्णा मंत्री संजय राठोड यांचे समर्थक होते. मृतक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसुलचे रहिवाशी आहेत. भिवंडीजवळ शिवशांती लॉन येथे नाश्ता करायला उतरल्यावर आला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना टेंभी नाका येथील सिटीझ हॉस्पिटलमध्ये नेले मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 


Dasara Melava 2022 Live Updates : मेळाव्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांचं ट्वीट, विचारांचे वारसदार म्हणत केलं ट्वीट


शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या वतीने ते दसरा मेळाव्यात सहभागी झाले होते. आज प्रवासात अल्पोपहार करण्यासाठी भिवंडी येथे उतरले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पोस्टमार्टम झाले असून अंत्यसंस्कार हरसूल येथेच होणार असल्याची माहिती त्यांचा मोठा मुलगा गोपाल मांजरे यांनी दिली. 


श्रीकृष्णा मांजरे हे मंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक


श्रीकृष्णा मांजरे, वय 60 वर्षे. हरसूल येथील निष्ठावंत शिवसैनिक होते. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. दिग्रस आणि परिसरात होणाऱ्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची आवर्जून हजेरी असायची. मंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. शिवसेनेचा भगवा शेला नेहमी त्यांच्या खांद्यावर असायचा. शेती, शेत, मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे. त्यांच्या मागे पत्नी, 3 मुले आणि एक विवाहित मुलगी, नातवंड, सुना असा मोठा परिवार आहे. कालच दुरगोत्सवात त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


PHOTO: शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर पूर्ण तयारी; खास तयारीची ड्रोननं घेतलेली दृश्य पाहा


CM Eknath Shindeयांच्या भाषणाआधी 111 साधू शंखनाद करणार,अयोध्येचे महंत शिंदेंना धनुष्यबाण भेट देणार