Dasara Melava 2022 Live Updates : ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Dasara Melava 2022 Live Updates : शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी तोफा धडाडणार आहेत.
Dasara Melava 2022 Live Updates : काहींनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Dasara Melava : उद्धव साहेब तुम्ही तुमच्या कुटूंबाला सांभाळू शकत नाही तर महाराष्ट्रला काय सांभाळणार ? असा टाला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कोणी मोठं होत असेल तर त्यांना संपुष्टात आणलं जातं असा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केलाय.
Dasara Melava 2022 Live Updates : शिंदे गटाचं हिंदूत्व म्हणजे EDच्या ऑफिसमध्ये जागृत झालेलं नेतृत्व: सुषमा अंधारे #DasaraMelava2022 #Shivsena #CMEknathshinde #UddhavThackeray https://marathi.abplive.com/news/politics/dasara-melava-2022-live-updates-uddhav-thackeray-shivaji-park-dasara-melava-cm-eknath-shinde-dasra-melava-bkc-mumbai-shivsena-pankaja-munde-dasara-melava-bjp-gopinath-gad-bhagwangad-deekshabhoomi-nagpur-1107058
Dasara Melava 2022 Live Updates : शिंदे समर्थकांच्या अनेक गाड्या मुख्यमंत्र्यांचं भाषण होण्याआधीच माघारी फिरल्या
Dasara Melava 2022 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर पोहोचले तर उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर जाण्यासाठी निघाले
Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाने जाेरदार शक्तिप्रदर्शन करत मेळावे घेतलेत. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोघांनीही मोलाचा सल्ला दिलाय. मेळावे घेत असताना कोणीही कमरेखाली वार करु नयेत, तसेच खालच्या पातळीवर जावून टिका करु नये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही, हे शाहू, फुले आंबेडकरांचा विचार नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय...
'कुणी केला गद्दारी' अशा आशयाचे व्हिडीओ दाखवत बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, मोठ्या फ्लेक्सवर लावले व्हिडीओ
ठाकरे परिवारातील सदस्य निहार ठाकरे आणि त्यांच्या बाळासाहेबांच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर उपस्थिती लावली. आपण या मेळाव्यामध्ये जुने चेहरे पाहत आहोत, बाळासाहेबांच्या वेळचं वातावरण पाहायला मिळतंय असं स्मिता ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दादरकडून शिवतीर्थकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जाम… शिवतीर्थकडे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होतायत
महिलांची संख्या देखील लक्षणीय, सोबतच शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे पोस्टर घेऊन शिवतीर्थकडे जातायत
Uddhav Thackeray: शिवाजी पार्कवर लाखो लोक आले आहेत. उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला शिवसैनिक उत्सुक आहेत.
शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातून अनेक मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव उस्मानाबाद औरंगाबाद येथून सुद्धा अनेक मुस्लिम बांधव उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहे विशेष म्हणजे घोळक्या घोळक्याने मुस्लिम बांधव हे शिवतीर्थावर दाखल होत असून जय भवानी जय शिवराय अशा घोषणा देत अनेक मुस्लिम जगते शिवतीर्थावर दाखल होत आहे अशाच मालेगाव येथून आलेल्या मुस्लिम बांधवांची संवाद साधला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला ठाकरे गटाचे हे नेते भाषण करणार?
किशोरी पेडणेकर
नितिन देशमुख
भास्कर जाधव
सुषमा अंधारे
अरविंद सावंत
आदित्य ठाकरे
उद्धव ठाकरे
56 वर्षे आमच्या पक्षाचा मेळावा शिवतीर्थावर होतो आहे. एक नेता, एक मैदान आणि एक विचार आहे. दुसरा कोणाचा मेळावा होतो हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदेंच्या बाजूला जे जातात ते रोज नवीन घोषणा करत असतात. 50 खोके एकदम ओक्के असंच त्यांचं काम आहे. मी स्टेजच्या समोर बसून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकायचो, आज उद्धव ठाकरे यांचे विचार एकणार आहे- भास्कर जाधव, आमदार
Dasara Melava: शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत .गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाला देखील दसरा मेळाव्याची उत्सुकता होती. शिंदे गटाच्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरले आहेत या मेळाव्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभेतून सुमारे साडेचारशे बसेस बीकेसीच्या मैदानावर धडकणार आहेत. या साडेचारशे बसेस मधून सुमारे 15000 कार्यकर्ते कल्याण लोकसभेतून बीकेसीच्या दिशेने निघणार आहेत. एकट्या कल्याण डोंबिवलीमधून सुमारे दोनशे बसेस मेळाव्यासाठी जाणार आहेत.
ठाण्यातील ठाकरे गटातील शिवसैनिक स्थानकावर दाखल, खासदार राजन विचारे, केदार दिघेंसोबत शिवसैनिक दाखल
ठाण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार नाहीत, 9 आॅक्टोबरला प्रबोधन यात्रेची सभा, प्रबोधन यात्रेच्या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नसणार, इतर व्यग्र कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती, ठाण्यात होणार आहे 9 आॅक्टोबरला प्रबोधन यात्रेची सभा, टेंभी नाका येथे होणार सभा, ठाकरे गटाची होणार सभा, सभेला सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि विनायक राऊत हे सभेला संबोधित करतील, ठाकरे गटातील पदाधिकारी चिंतामणी कारखानीस यांची माहिती
Dasara Melava Mumbai Shivsena Updates: आज होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी राज्याचे कोनेकोपऱ्यातून शिवसेना कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. अंबरनाथ विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बीकेसी मैदानावरचा मेळाव्यासाठी निघाले आहेत. साधारण 60 बसेस भरून कार्यकर्ते आहेत
वाशी टोल नाक्यावर मुंबईला येणाऱ्या ठाकरे किंवा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या हळूहळू वाढत आहेत... दुसरीकडे ठाण्यातील ठाकरे गटातील शिवसैनिक टेंबी नाक्यावरुन ठाणे स्थानकाकडे निघालेत
असा असेल BKC मैदानावरील शिंदे गटाचा दसरा मेळावा..
5.30 वाजता नंदेश उमप यांच्या कार्यक्रमाने होणार सुरवात...
6.30 वाजता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या भाषणाला सुरुवात...
7.25 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळावा ठिकाणी येताच 111 साधूंकडून शंख नाद केला जाणार
मुख्यमंत्री शिंदे यांना अयोध्या येथून आलेल्या साधूंकडून चांदीची धनुष्य आणि गदा दिली जाईल..यापुढे आता हिंदुची धुरा तुम्ही सांभाळा असे आशीर्वाद दिले जाईल..
त्यानंतर 40 आमदार 12 खासदार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करतील...
8.15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु होईल
साधारण 1 तास भाषण चालणार आहे...
तुम्हाला कुणाचं भाषण ऐकायचंय? उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदेंचं? खालील लिंकवर दोन्ही भाषणं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत... तर मग क्लिक करा आणि अपडेट राहा
https://marathi.abplive.com/dasara-melava-2022-live-tv
Dasara Melava Updates: मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्यातून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. कितीही गद्दार आले तरीही त्यांना जमिनीत गाडून आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी जिल्ह्यातून सुमारे 25 हजार कार्यकर्ते आणण्याची तयारी केली आहे. यासाठी सुमारे २५० बसेस आणि ५०० खाजगी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही कार्यकर्ते हे रेल्वे आणि बोटीने मुंबईत दाखल होणार आहेत. तर, आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाची काय ताकद आहे हे दिसणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा हाच खरा शिवसेनेचा मेळावा असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने देखील जोरदार तयारी केली आहे. यामध्ये, उद्धव ठाकरे यांना मानणारे सुमारे २५ हजार कार्यकर्ते हे मुंबईतील शिवाजी पार्कवरील मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. यासाठी, खाजगी बसेस आणि कारने हे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाल्याने मुंबई - गोवा हायवेवर आज दुपारपासून शिवसेनेच्या गाड्यांची मोठी वर्दळ सुरू आहे. यावेळी, मूळची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची असून कितीही गद्दार आले तरीही त्यांना जमिनीत गाडून आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे म्हटले आहे.
Dasara Melava News Updates: मुंबईला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या शिवसैनिकाचा मृत्यू, श्रीकृष्णा मांजरे असं मृतक कार्यकर्त्याचं नाव. मृतक श्रीकृष्णा हे मंत्री संजय राठोड यांचे समर्थक. मृतक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसुलचा रहिवाशी. भिवंडीजवळ शिवशांती लॉन येथे नाश्ता करायला उतरल्यावर आला हृदयविकाराचा तीव्र झटका. टेम्भी नाका येथील सिटीझ हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कोल्हापुरातून ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. कोल्हापूरच्या एका पट्ट्याने चक्क डोक्यावर नारळ फोडून गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना केलीय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार विसरलेले विचार आज पुन्हा ऐकायला मिळणार आहेत.... त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी होत आहे.. आमचीच शिवसेना खरी आहे, अशी प्रतिक्रिया नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलीय
Dasara Melava News Updates: शहापूरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात हाणामारी, मुंबई नाशिक महामार्गवर कसारा भागात दोन्ही गट आमनेसामने, मुंबईच्या दिशेने जात असताना झाला वाद, सावंत हॉटेलवर दोन्ही गट आमने सामने
Mumbai Dasara Melava News: ठाकरे गटातील ठाण्यातील शिवसैनिक एकत्र जमायला सुरुवात, दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थवर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला एकत्रित लोकलनं दादरला जाणार, ‘वाजत गाजत या, गुलाल उधळत या, पण शिस्तीने या’ शिवसैनिकांना आवाहन केल्याप्रमाणे वाजत गाजत येणार, त्यासाठी बॅंड आणण्यात आलाय, मात्र दरवर्षी असणारी शिवसैनिकांची संख्या यावर्षी रोडावली, थोड्याच वेळात खासदार राजन विचारे, केदार दिघे असे ठाकरे गटातील नेते दाखल होणार
Dasara Melava Updates: BKC च्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी आणि खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोष्टर लावत 0 ते 20 पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना महिला कार्यकर्त्यांचा चोप, चालत्या वाहनातून आक्षेपार्ह हावभाव केल्याचा महिला शिवसैनिकांचा आरोप, अश्लील इशारे केल्याचा कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच चोप, नाशिक मुंबई महामार्गावरील शहापूर जवळ घडली घटना
Shivaji Park Dasara Melava : शिवाजी पार्कवरील मेळावा खरा आहे. बाळासाहेबांनी म्हटलं होत कि उद्धवला सांभाळा...आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शिंदे गटाकडे कोट्यवधी रुपये आहेत म्हणून खर्च केला जात आहे. बीकेसीतील मेळाव्यासाठी 52 कोटी खर्च केले गेले आहेत. हे पैसे कुठून आलेत याची माहिती घेत आहोत. पुरावे गोळा करत आहोत. दोन दिवसांत पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करणार आहोत. हा सर्व प्रकार उघड करु, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. मी नाराज कुणावर होऊ, मी नाराज नाही. हे काही घरगुती भांडण आहे का? राजकारण आहे. संघर्ष माझ्या वाट्याला आहे. मी मंत्री आहे का, साधी ग्रामपंचायत सदस्य नाही तरीही तुम्ही का आला आहेत. त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्या आता माध्यमांनी बंद करावे अशी हात जोडून विनंती आहे. त्यामुळे माझ्यासाठी आता हा विषय संपला असून, 2024 च्या तयारीला लागा.
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : "शिवसेनाप्रमुख असते तर हे दोन दसरा मेळावा घेण्याची वेळ आली असती का? पूर्ण आयुष्य राष्ट्रवादीशी संघर्ष केला त्याच राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काम केलं. आमच्या सभेला भाजपच्या माणसांची गरज नाही मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी चालावते हे मात्र खरं आहे. एकनाथ शिंदे यांना कोणाची आवश्यकता नाही, 50 आमदार आहेत. शिवतीर्थावरती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत सभा होईल तर बीकेसीवरची सभा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असेल. खोक्यांची भाषा मातोश्रीने करायची, आम्ही तोंड उघडलं तर त्यांची अडचण होईल. त्यावेळी भाजपच्याविरोधात एकनाथ शिंदेच नाही तर मीही बोलत होतो कारण आमचा पक्ष आम्हाला मोठा करायचा होता. मंत्रिमंडळ बैठकीत कोणता विषय लावून धरायचा, कशाला विरोध करायचा हे उद्धव ठाकरे मला सांगायचे. मात्र सुभाष देसाईंसारखे झोपाळू लोक त्यांच्यासोबत असताना ते काही बोलायचे नाही," असं रामदास कदम म्हणाले.
मला संधी दिली नाही, याबाबत माझी कोणतेही तक्रार नाही. मी नाराज नाही. याबाबत मला काहीही स्पष्टीकरण द्यायचं नाही.
सगळ्यांना वाटते आपल्या नेत्याला काहीतरी मिळावे, यात काय चूक आहे. मला काहीही मिळाले नाही यामुळे नाराज आहे असे नाही. माझ्या समाजातील लोकांना काही मिळत असेल तर मला त्याचा आनंद आहे. पण समाजाच्या भीती कुणी उभ्या केल्यातर त्याला क्षमा नाही.
या मेळाव्यात काय होणार आहे. हा चिखलफेक करणारांचा मेळावा नाही. हा चिखल तुडवणारांचा मेळावा आहे. माझ्यावर खालच्या पातळीवर आरोप करणाऱ्या लोकांवर कधीच मी टीका केली नाही. माझ्याकडे तुम्हाला द्यायला खुर्च्या नव्हत्या. मी जर खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा चौपट मोठा झाला असता. कुणाचे जोडे उचळणारांचा कधीच इतिहास होत नाही. भगवान बाबांनी ही संघर्ष केला किती वेदना दिल्या. मुंडे साहेबांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. मी संघर्षाला घाबरत नाही.मी कधीही रुखणार नाही. मी कधीही कुणासमोर झुकणार नाही
Pankaja Munde Bhagwan Bhaktigad Melava : हा चिखलफेक करणाऱ्यांचा मेळावा नाही, हा चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. माझ्यावर खालच्या पातळीवर आरोप करणाऱ्यांवर कधीच टीका केली नाही. माझ्याकडे तुम्हाला द्यायला खुर्च्या नव्हत्या, मी जर खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा चौपट मोठा झाला असता. भगवानबाबांनीही खूप संघर्ष केला. त्यांनाही तिती वेदना दिल्या. मुंडे साहेबांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली, मुंडे साहेबांनी संघर्ष कमी केला का?
Shivaji Park Dasara Melava : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्याला राज्यभरातून अनेक शिवसैनिक शिवाजी पार्कला पोहोचत आहेत. त्यात धुळे येथील संभाजी पाटील हा तरुण शिवसैनिक देखील आलेला आहे. तो पोस्टरच्या माध्यमातून मेळाव्यात आपल्या भावना मांडताना दिसत आहे.
Dasara Melava:हा चिखलफेक करणाऱ्या लोकांचा नव्हे तर चिखल तुद्व्णाऱ्या लोकांचा मेळावा आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांवर कधीच टीका केली नाही, ते आमच्या रक्तात नाही.
आता संघर्ष बस झाला, आता पंकजा मुंडे तुम आगे बढो अशा घोषणा दिल्या पाहिजे. एक महिला एवढ्या मोठ्याप्रमाणावर मेळावा घेत असल्याचे आमचं वेगळपण आहे.
Eknath Shinde Dasar Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या भाषणाआधी 111 साधू संतांकडून शंख नाद होणार असून बीकेसीतील दसरा मेळाव्याला अयोध्येचे महंत उपस्थित राहणार आहेत. सर्व साधूसंतांच्या उपस्थितीत मंत्र पुष्पाजंली अर्पण करत एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जाणार आहे. याशिवाय अयोध्येच्या महंतांना धनुष्यबाण भेट दिले जाणार आहे.
Eknath Shinde Dasara Melava : बीकेसीवरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिनेमातील अभिनेत्याप्रमाणे एन्ट्री होणार आहे. स्टेजच्या खालून हायड्रॉलिक पद्धतीने एकनाथ शिंदे वर येणार आहे. हा स्टेज 40 बाय 120 फुटांचा असून दोन्ही बाजूला 15 बाय 20 फुटांच्या दोन एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. हे संपूर्ण मैदान 2600 बाय 250 फूट लांब असून इथे 1 लाख 20 पेक्षा जास्त खुर्च्या लागल्या आहे. त्यात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सेक्शन वेगळे असणार आहेत. संपूर्ण मैदानात शेवटपर्यंत 15 एलईडी स्क्रीन लावल्या आहेत.
Beed News: दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगावात दसरा मेळाव होत असून, पंकजा मुंडे मेळाव्यास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही वेळात त्यांच्या भाषणाला सुरवात होणार आहे. त्यामुळे आपल्या आजच्या भाषणात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BKC Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आमदार, खासदार, शिवसेनेचे मोठे नेते अशा 1000 व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांसाठी विशेष जेवणाची सोय करण्यात आली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी तीन कॅन्टीन तयार करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी विशेष कॅन्टीन तर दुसरी कॅन्टीन आमदार, खासदार आणि मोठ्या नेत्यांसाठी असेल. तर तर तिसरी कॅन्टीन राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी जे बीकेसी मैदानावर दाखल होतात त्यांच्या जेवणाची विशेष सोयीसाठी आहे.
Beed: सावरगाव येथे होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर गोपीनाथ गडापासून निघालेली प्रीतम मुंडे यांची रॅली भगवान भक्तीगडावर दाखल झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Uddhav Thackeray Dasara Melava : श्री.तुळजाभवानी एक्सप्रेसने उस्मानाबाद जिल्ह्यातील ठाकरे गटातील शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ही ट्रेन दुपारी मुंबईत पोहोचेल. उस्मानाबाद जिल्ह्यातून शिवतीर्थ मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी श्री तुळजाभवानी एक्सप्रेस या विशेष रेल्वे गाडीने ठाकरे गटातील शिवसैनिक उस्मानाबाद येथील रेल्वे स्थानकावरुन पहाटे अडीचच्या सुमारास रवाना झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या वतीने या विशेष रेल्वे गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.
Gulabrao Patil on Dasara Melava : "आमचा विचार हा बाळासाहेबांचा आहे. बाळासाहेब आजही आमच्यात आहेत. मृत्यूनंतर आत्मा जात असतो विचार मात्र तसेच राहतात तेच विचार आम्ही मंचावर मांडणार आहोत. इकडे बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहे तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. बाळासाहेबांचं प्रापर्टी कार्ड नाही तर विचारांचा सातबारा आम्हाला मिळाला आहे. हिंदुत्वाचा सातबारा आहे आणि या सातबारावर आम्ही ध्येय धोरण मांडणार आहोत. शिवतीर्थावर महाविकास आघाडीचे मिक्स विचार मांडले जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची निष्ठा म्हणावी की महाविकास आघाडीच्या लोकांसोबत लव मॅरेज केले त्यांची निष्ठा म्हणावी. गुलाबराव पाटलांची तोफ कोणत्या दिशेने जाईल हे माहित नाही पण त्यातून आग निघेल हे मात्र निश्चित आहे," असं राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील म्हणाले.
Ajay Chaudhary Dismisses Krupal Tumane's Claim : शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. "जो दावा केला जातो तो सपशेल चुकीचा आहे. उद्धव ठाकरेंसोबत सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आज असे काही दावे केले जात आहेत ते फोल आहेत. लोकं स्वतःहून गर्दी करत आहेत, त्यांना जबरदस्तीने आणलं जात नाही. नाहीतर बीकेसीला येणाऱ्या लोकांना माहित नाही कसं, कोण, कुठे घेऊन चाललं आहे. सगळ्यांना आमिषं दाखवून आणलं आहे. आज उद्धव ठाकरे उत्स्फूर्तपणे भाषणं करतील. शिवसैनिकांना दिशा मिळेल, असं उद्धव ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी म्हटलं आहे.
Maratha Kranti Thok Morcha Supports Eknath Shinde's Dasara Melava : मराठा क्रांती ठोक मोर्चाने दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवले म्हणून पाठिंबा देत असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटलं. दसरा मेळाव्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झाल्याचा दावा केरे यांनी केला आहे.
BKC Dasara Melava : बीकेसी मैदान आणि रस्त्यावर शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना असं लिहिलेले भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. सामान्यत: शिवसेना पक्षाचा झेंडा केवळ भगवा ध्वज आहे. मात्र, धनुष्यबाण चिन्हावरुन दोन गटांमध्ये सुरु असलेली रस्सीखेच पाहता शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक धनुष्यबाण चिन्ह असलेले भगवे झेंडे लावले जात आहेत.
Eknath Shinde Dasara Melava : मुंबईतील बीकेसी मैदानात होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवली जाणार आहे. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची रिकामी खुर्ची असेल. तर दुसरीकडे शिवतीर्थावरील ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची ठेवली जाणार आहे.
Empty Chair for Sanjay Raut : नेस्कोप्रमाणेच आजच्या दसरा मेळाव्यात देखील शिवसेना खासदा संजय राऊत यांची जागा रिक्त ठेवली जाणार आहे. शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत यांचे आजचे भाषण गाजले असते, पण त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळेच आज देखील त्यांच्यासाठी एक खुर्ची त्यांच्या नावाच्या पाटीसह रिकामी ठेवली जाणार असल्याचं कळतं
Eknath Shinde Dasara Melava : मुंबईत एसटी आणि खासगी बसेस बरोबरच खासगी गाड्यांमधून देखील शिवसैनिक दाखल होताना दिसत आहेत. वैजापुरातून काही शिंदे गटातील शिवसैनिक दाखल होत आहेत.
Vanity Van for CM Eknath Shinde : बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज आहे. एअर कंडिशन अशी ही व्हॅनिटी व्हॅन ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी बसण्याची त्याचबरोबर आवरण्यासाठी आराम करण्यासाठी आलिशान सोयी करण्यात.
Eknath Shinde Dasara Melava : अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून 500 बसेस घेऊन शिवसैनिक बीकेसीवर पोहोचले आहेत. एवढेच नाही तर काही शिवसैनिक विमानाने देखील मुंबईत पोहोचत आहेत. औरंगाबादच्या विमानतळावरुन 70 शिवसैनिक सकाळच्या विमानाने मुंबईमध्ये दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. ते बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात सहभागी होतील.
Dasara Melava Traffic Update : मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी एन्ट्री पाॅईंट्स आहेत तिथे वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. अवजड वाहनांना मुंबईतील प्रवेश बंद ठेवला आहे. तशाप्रकारचे परिपत्रक आम्ही काढले आहे. परतीच्या मार्गांवर देखील नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत लोंढे यांनी दिली
Uddhav Thackeray Dasara Melava : पुण्याच्या भोर तालुक्यातून हातात मशाल घेऊन काही शिवसैनिक पायी शिवतीर्थाच्या दिशेने निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी आम्ही भोर तालुक्यातून आल्याची माहिती देखील शिवसैनिकांनी दिली आहे.
RSS Vijayadashami : नागपुरातील रेशीम बाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडत आहे. सरसंचालक मोहन भागवत आणि आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी पद्मश्री संतोष यादव यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात संघाचे पहिले सरसंघचालक डॉ हेडगेवार यांच्या स्मृती स्थळाला पुष्पांजली अर्पित केली. यानंतर ध्वजवंदन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत.
Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातून जवळपास तीन ते चार हजार कार्यकर्ते खाजगी गाड्यांच्या माध्यमातून मुंबईला रवाना झाले आहेत. अनेक ट्रॅव्हल्स बसेस आणि वैयक्तिक गाड्या घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. यावेळी वेंगुर्ले येथील कार्यकर्ते एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्ही बाजूच्या दसरा मेळाव्याला उस्फूर्तपणे कार्यकर्ते मुंबईला मिळेल त्या वाहनाने रवाना झाले आहेत.
Uddhav Thackeray Dasara Melava : शिवाजी पार्कवर आज होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी काही निष्ठावंत शिवसैनिक अहमदनगर जिल्ह्यातून आले आहेत तर काही परराज्यातून आलेले आहेत. बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आणि भक्त असलेले गणेश झगरे हे अहमदनगर जिल्ह्यतून नेवासा तालुक्यातील मक्तापुर गावातून शिवाजी पार्क मैदानावर आले आहेत. शिवसेनेचे हे कट्टर समर्थक उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आणि शिवसेनेला बळकट करण्यासाठी पोहोचले आहेत. एवढंच नव्हे तर स्वतःच्या जेवणाची काळजी स्वतः घेतली असून गावातूनच येताना भाकरी, चटणी, कांदा आणले आहेत. त्याचबरोबर पर राज्यातून म्हणजे झारखंड राज्यातून काही सच्चे शिवसेनेचे कार्यकर्ते आले आहेत. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी तसेच बाळासाहेबांबद्दल असलेलं आपलं प्रेम आणि निष्ठा दाखवण्यासाठी आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Eknath Shinde Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी गावावरुन मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एकनाथ शिंदे गटाकडून वाशी इथल्या सिडको एक्झिबिशनमध्ये नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. जवळपास 35 हजार कार्यकर्ते दिवसभरात इथ येऊन नाष्टा, जेवण करुन मुंबईत जातील. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील कार्यकर्ते या ठिकाणी येतील.
Dasara Melava 2022 Live : स्थापनेनंतर आज पहिल्यांदा मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. एकीकडे मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला संबोधित करतील तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात आपल्या समर्थकांना संबोधित करतील. या पार्श्वभूमीवर रात्री साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे MMRDA मैदानावर पोहोचले आणि आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. सुमारे 45 मिनिटं मैदान, व्यासपीठाचा आढावा घेतल्यानंतर ते तिथून निघाले. परंतु यावेळी त्यांनी मीडियाशी बोलणं टाळलं. आता दसरा मेळाव्याच्या भाषणात एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे.
पार्श्वभूमी
Dasara Melava 2022 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार, राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. हा वाद कोर्टात असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये दसऱ्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. गर्दी जमविण्यासाठी उभय बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला जात आहे. दोन्हीकडे मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे.
या मुद्द्यांवर बोलणार?
उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा प्रमुख विषय शिंदे गट आणि भाजपवर असेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका होण्याचे संकेत आहेत. तसेच विविध मुद्द्यांवरून केंद्राला धारेवर धरले जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन
राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडय़ा आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मैदानात लाखभराहून अधिक खुर्च्याची व्यवस्था असून, आणखी हजारो कार्यकर्ते बाजूच्या मैदानांवर आणि परिसरात असतील. त्यांच्या खाण्यापिण्याची, वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -